पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त
विलास कारखान्याच्या वतीने वृक्षारोपन, सर्वरोगनिदान शिबीर,
शैक्षणिक साहित्य वाटपासह विविध उपक्रमांचे आयोजन
लातूर ( प्रतिनिधी ): १७ मार्च २०२२:
विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळीच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत सोमवार दि. २१ मार्च २०२२ रोजी कारखाना स्थळी वृक्षारोपन, सर्वरोग निदान शिबीर, निळकंठेश्वर विदयालय, निवळी व कारखाना वसाहत येथील शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप, आणि मातोश्री वृध्दाश्रम येथे जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात येणार आहे.

सहकार आणि साखर उदयोगात दिलेल्या योगादानामूळे ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडे आधुनिक साखर उदयोगाचे जनक म्हणून पाहिल जात. विलास सहकारी कारखान्याची अल्पकाळात उभारणी केली. कारखान्याची चाचणी हंगामापासून यशस्वी वाटचाल सुरू आहे. विलास कारखान्याच्या माध्यमातून उसविकास योजना, ऊसशेती यांत्रीकीकरण, सेंद्रिय शेती योजना, पाणी व्यवस्थापन प्रयोग, जलसंधारण, नदीचे खोलीकरण, रुंदीकरण योजना, पर्यावरण संर्वधनासाठी वृक्षारोपन योजना, सभासद व कामगारासाठी विविध कल्याण योजना राबविल्या, आर्थिक व्यवस्थापन करून सभासद आणि ऊसउत्पादकांना चांगला ऊसदर दिला आहे. या राबविण्यात आलेल्या सर्व योजना साखर उदयोगासाठी पथदर्शी ठरल्या आहेत. आज राज्यपातळीवर कार्य करतांना विकासाचा पहिला घास लातूरला मिळेल ही परंपरा त्यांनी जोपासली आहे. ना.देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विलास साखर कारखान्यामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत सोमवार दि. २१ मार्च २०२२ रोजी कारखाना स्थळी सकाळी वृक्षारोपन करण्यात येणार आहे, यांनतर सर्वरोग निदान शिबीरामध्ये आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. निळकंठेश्वर विदयालय, निवळी व कारखाना वसाहत येथील शाळेत गरजवंत विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच लातूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात येणार आहे.

कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक सजीव देसाई संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानेबा पडीले यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
——————-