28.1 C
Pune
Wednesday, September 10, 2025
Homeआंतरराष्ट्रीय*अमेरिकेतील ब्रिंगहॅम यंग युनिव्हर्सिटी तर्फे डॉ. कराड यांना मानद डिलीट पदवी*

*अमेरिकेतील ब्रिंगहॅम यंग युनिव्हर्सिटी तर्फे डॉ. कराड यांना मानद डिलीट पदवी*

विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती निर्माण होण्याचा

संदेश जगभर पोहचविला- विश्वशांतीदूत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड

यूएसए, उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी (बीवाययू) तर्फे
विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांना मानद डी.लिट.प्रदान

पुणे, : शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना यूएसए, उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
बीवाययूचा २०२४ बॅचच्या दीक्षांत समारोह गुरूवारी २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीवाययूचे अध्यक्ष डॉ. सी.शेन रीस, एल्डर डी टॉड क्रिस्टोफरसन, एल्डर रोनाल्ड रासबँड, एल्डर गेरिट गाँग, रॉन गनेल, रिचर्ड नेल्सन, किंग हुसेन, डॉ. अशोक जोशी आणि बोर्डाचे इतर विश्वस्त सदस्य उपस्थित होते.
डीलिट पदवी प्रदान करताना अध्यक्ष सी शेन रीस यांनी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतूक केले. तसेच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापनेला देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचाचे कौतुक केले.
डीलिट स्वीकारल्यानंतर विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्ब कम आणि विश्वशांतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर हे निसर्ग तत्व आहे. आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे. परंतू आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही. जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजचे आहे.”
“अमेरिकेतील आघाडीचे विद्यापीठ बीवायू व एमआयटी डब्ल्यूपीयू यांच्यात सहकार्य निर्माण व्हावे, तसेच जगात शांती संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी मूल्याधारित शिक्षण प्रणालीच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी जगातील इतर विद्यापीठांचाही समावेश होईल. अशी डॉ. कराड यांनी आशा आहे.”
“माझ्या जीवनावर महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यासारख्या थोर तत्वज्ञ संताचा आणि डॉ. अल्बर्ट आइनस्टाईन सारख्या शास्त्रज्ञांचा चिरस्थायी प्रभाव पडला आहे. माझी मोठी बहिण प्रयागअक्का कराड यांचा ही प्रभाव आहे. त्याच प्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.” असे उद्गार डॉ. विश्वनाथ कराड यांनी या प्रसंगी काढले.
या समारंभात बीवायूच्या १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विविध विषयातील पदवी पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदव्यांचा समावेश होता. या दीक्षांत समारोहात सुमारे २५ हजार नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळ – विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांना मानद डी.लिट.प्रदान करताना एल्डर डी टॉड क्रिस्टोफरसन व अध्यक्ष सी शेन रीस

लातूर, दि. १७ मे : भारतीय तत्वज्ञान हे त्याग, भक्ती, आपुलकी आणि सदभावना यावर आधारित आहे. परंतु दुर्देवाने जगभरात उच्च प्रगत शैक्षणिक प्रणालीमुळे या पैलूला बगल दिली गेली आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेत भारताचे महान पुत्र स्वामी विवेकानंद यांनी बोललेले भविष्यसूचक शब्द केवळ विज्ञान आणि धर्म/अध्यात्म यांचे एकत्रिकरणच मानवजातीत सुसंवाद आणून शांती निर्माण करेल असे प्रतिपादन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वशांतीदूत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले. 

तत्वज्ञ संत श्री. ज्ञानेश्वर महाराज व तत्वज्ञ संत श्री. तुकाराम महाराज यांचे तत्वज्ञान, युगपुरूष स्वामी  विवेकानंद यांच्या विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचा व विश्वशांतीचा संदेश यशस्वीरित्या जगभर पोहचवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वशांतीदूत प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ यूके आणि अमेरिका या देशाचा यशस्‍वी दौरा पुर्ण करुन नुकतेच मायदेशी परतले. अमेरिकेतील, उटाह राज्यातील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. या शिष्टमंडळात एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. महेश थोरवे व अधिष्ठाता प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते. 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर तालुक्‍यातील मौजे रामेश्‍वर येथील संत श्री. गोपाळबुवा महाराज मंदिर परिसरात होत असलेल्‍या अखंड हरीनाम सप्‍ताह सोहळयात सहभागी होण्‍यासाठी विश्वशांतीदूत प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड आले असता शुक्रवारी दुपारी काल्‍याच्‍या किर्तनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना वरील प्रतिपादन केले. यावेळी हभप तुळशीराम कराड, काशीराम कराड व एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्बकम आणि विश्व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर हे निसर्ग तत्व आहे. आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे. परंतू आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही. जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. 

“जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्माचा अभ्यास होणे गरजचे आहे. तसेच मनाचे रसायनशास्त्र आजपर्यंत कोणालाही कळलेले नाही. त्यासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मनाच्या शास्त्राचा समावेश करावा.” असे सांगून प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड यांनी लंडन येथील ऑक्सफोर्डमध्ये आयोजित ‘मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती’ यावरील गोलमेज परिषदेत “आज जगामध्ये दहशतवाद, घातपात, रक्तपात, जातीय व धर्मवादामुळे अशांतता व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे कमी करण्यासाठी शिक्षण पद्धतीत वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यातुनच विश्वशांतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असे बोलून दाखविले. 

अमेरिकेतील ऑर्ट इन्स्टीट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यान जे ऐतिहासिक भाषण केले त्या ठिकाणी विश्वधर्मी प्रा.डॉ. कराड यांनी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्याचा संकल्प घेतला. गोलमेज या परिषदेमध्ये वॉर्विक येथील लॉर्ड टेलर, थोर शिक्षणतज्ञ डॉ. नील हॉक्स, लंडन येथील तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे विचारवंत डॉ. गौतम चक्रवर्ती, लंडन स्थित इंडियन हाय कमिशनच्या डॉ. निधी चौधरी, केंब्रिज विद्यापीठाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. ब्रायन फोर्ड, स्वित्झरलँड येथील डॉ. जेफ्री क्लेमेंटस हे सहभागी झाले हेाते. 

अमेरिकेतील ब्रिंगहॅम यंग युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टर कराड यांना मानद डिलीट पदवी

ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना देण्‍यात आलेल्‍या मानद डी.लिट. पदवी प्रदान समारंभास विविध देशातील २५ हजाराहून अधिक नागरीक उपस्थित होते अशी माहिती देण्‍यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]