निलंगा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा सत्कार
निलंगा-(प्रशांत साळुंके)-
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी भाजपा विजय संकल्प 2024 अभियानाच्या प्रदेश सदस्य पदी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करून महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिले. त्यामुळे निलंगा येथील जनसेवा कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या तालुका पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पहार घालून फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

त्यावेळी निलंगा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, उपाध्यक्ष मनोज कोळ्ळे, डॉक्टर किरण बाहेती, डॉ, प्रमोद हातागळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तम्मा माडीबोने, युवा मोर्चा जिल्हा सचिव उमेश उमापुरे ,किशोर जाधव ,पांचाळ पिंटू, खदिर मसुलदार, किशोर लंगोटे, पिंटू पाटील, शफिक सौदागर, तालुका सरचिटणीस कुमोद लोभे, बंटी देशमुख, दापका ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव,अप्पाराव साळुंखे अर्जुन पौळ, सातपुते रमेश, वैभव पाटील, रवी कांबळे, भाजप युवती मोर्चा अध्यक्षा कु. प्रणिता केदारे, आशिष पाटील, नागेश पाटील ,मौजे तुपडीचे सरपंच, जामगा गावचे सरपंच मनोज पवार, शेळगीचे सरपंच बंकट बिरादार व सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.





