*अरुणा दिवेगावकरांचा सन्मान*

0
626

*दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार अरुणा दिवेगावकर यांना जाहीर*  
➖➖➖➖➖➖➖➖➖
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील संशोधन केंद्र, तरवडी ता. नेवासे जिल्हा-अहमदनगर येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य व पत्रकारिता (वर्ष २०२०-२१) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये  लेखिका अरुणा दिवेगावकर,  लातूर लिखित  ‘ज्योतिर्मय सावित्री -एक समताधिष्ठित सहजीवन’ हरिती प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेस दीनमित्रकार मुकुंदराव पाटील  साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

दीनमित्रकार स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व समितीचे सचिव उत्तमराव पाटील यांनी ही घोषणा केली.

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती 1995 पासून पत्रकार व साहित्यिक यांना पुरस्कार देउन गौरव करते. या वर्षी पुरस्कार समारंभ येत्या १९ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित केला असून सदर पुरस्कारांचे वितरण मा. शंकररावजी गडाख, मृदा व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

 

राहुल लोंढे, 73855 21336

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here