■ कोविड१९ लसीकरण, रक्तदान या सामाजिक उपक्रमाने साजारा केला वर्धापन दिन.■
लातूर; ता१:
अर्थवर्धनी जानाई महिला पतसंस्थेचा सातवा वर्धापन दिन सामाजीक बांधीलकी जपत साजरा करण्यात आला.या निमित्त लातूर मनपा व पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड१९ लसीकरण शिबिर व भालचंद्र ब्लड बॅंकेच्या साह्याने रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या दोनही शिबिराचे उदघाटन पतसंस्थेच्या संस्थापक सदस्या प्रभारी अधिक्षक अभियंता अनिता जोशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रसिध्द दंतवैद्य डाॅ.जयंती अंबेगांवकर,भालचंद्र ब्लड बॅंकेचे उपाध्यक्ष जेष्ठ बालरोग तज्ञ डाॅ.मन्मथ भातांब्रे प्रमुख पाहुणे म्हणून तर पतसंस्थेच्या वतीने अध्यक्षा अभि.सौ. गीता ठोंबरे, सचिव उद्योजिका सौ.संपदा दाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

पतसंस्थेच्या शंभर पेक्षा जास्त स्नेहींनी रक्तदान व कोविड१९ लसीकरण करून घेतले. पतसंस्थेचे मार्गदर्शक स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक श्री.पळनिटकर साहेब, लाॅसेट परिक्षेत एड.श्रीनाथ जगन्नाथ पाटील यांनी यश मिळवल्या बद्दल तसेच पतसंस्था संस्थापक दिलीप कुलकर्णी यांचा वाढदिवसा निमित्त गौरव करण्यात आला.आर्थिक,शिक्षणिक,अध्यात्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्या बद्दल डाॅ.जगन्नाथ पाटील यांचा पतसंस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
रूपाताई शिवनगीकर, नितू अयाचित, निलिमा अंधोरीकर,पुजा कांबळे,मनिषा वैद्य, अनुपमा पाटील, अंजली कुलकर्णी, रोहिनी मुंढे,संगीता पवार, सरव्यवस्थापक संजय कुलकर्णी, व्यवस्थापक महेश पोतदार,अमृता देशपांडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.





