27.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeराजकीय*अर्थसंकल्पातील पंचामृताच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासाला गती-निलंगेकर*

*अर्थसंकल्पातील पंचामृताच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासाला गती-निलंगेकर*

अर्थसंकल्पावर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिक्रिया


लातूर /प्रतिनिधीः– राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृताच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासाला गती प्राप्त होणार असून दुरदृष्टी आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देऊन सादर केलेला हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणारा आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पंचामृताच्या माध्यमातून विकासाच्या गतीला अधिक वेग देत सर्वसमावेशक धोरणाचा अवलंब करत भरीव निधीची तरतुदीची वेगवेगळ्या माध्यमातून केलेली आहे. संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी विविध तरतूदी करून त्यांना आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. मुख्यतः एक रुपयात पिकविमा योजना जाहीर करण्यात आलेली असून ही रक्कमही राज्य सरकारच भरणार आहे. त्याचबरोबर शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार असल्यामुळे आता शेतकर्‍यांना या योजनेच्या माध्यमातून ठोस मदत मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या उत्पादनात अधिक वाढ व्हावी आणि शेती करणे अधिक फायदेशीर ठरावे याकरीता वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अधिकाधिक मदतीचे धोरण या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आखण्यात आलेले आहे. महिला वर्गासाठी अतिषय महत्वाचा ठरलेला हा अर्थसंकल्प त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा ठरणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून उद्योग सुरु होऊन त्यामध्ये उत्पादीत होणार्‍या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची तरतूर अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. मुलींसाठी लेक लाडकी ही योजना तर वरदान ठरणारी आहे. सर्व समाजाच्या विकासाठी महामंडळाची स्थापना करून त्याला निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, रोजगार, आरोग्य, शिक्षण व शेती या क्षेत्रासाठी मोदी तरतूद झाल्याने प्रत्येक समाज घटकाला त्याचा लाभ होणार असल्याचे ही माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सांगितले.


विशेषतः मराठवाडा वॉटरग्रीड योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजूरीला पाठविण्यात आलेला असून या माध्यमातून लातूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न शाश्वतरित्या सोडविला जाणार असल्याचे सांगून माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मराठवाड्याची दुष्काळमुक्तीकडे अधिक गतीने वाटचाल होणार असल्याचे स्पष्ट केले. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्यातून आता पाच लाख रूपया पर्यंतचा उपचार घेता येणार असल्याचे याचा लाभ राज्यातील जनतेला अतिषय फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर हिंदु हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळणार असल्याने आरोग्याबाबत जनतेला अधिकचा दिलासा प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांसाठी या अर्थसंकल्पातून भरीव मदत करण्यात आलेली असून समृद्धी आणि शक्तीपिठ महामार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाला अधिक चालणार मिळून त्याचा वेग वाढणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी देऊन या अर्थसंकल्पातील पंचामृत प्रत्येक समाज घटकांसह महाराष्ट्राच्या विकासाला वरदान ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]