निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील काजूची शेती करणारा शेतकरी अवलिया विष्णू कदम
खडकाल माळरानावर फुलविली कोकण शेती मराठवाड्यातील पहिला प्रयोग यशस्वितेकडे…!
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील शेतकरी अवलिया विष्णु कदम यांनी आपल्या खडकाल माळरानावर कोकणातील काजू लागवड केल्याने मराठवाड्यातील पहिला प्रयोग यशस्वितेकडे वाटचाल करित आहे.प्रचंड जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी अनेक प्रकारची कोकणातील फळ झाडांची रोपे आणून तीन एकरांवर बाग फुलविली आहे.त्यातील अर्धा एकर वरील काजूची बाग तर मोठ्या डौलाने बहरत आहे.या काजू डौलाच्या बहरात आणल्याने लातूर जिल्हाल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील शेतकरी याठाकाणी भेटी देऊन त्याची माहिती घेत आहेत.
निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील प्रगतशिल शेतकरी विष्णू कदम यांचा मुंबई येथे व्यवसाय असून ते गावी वडिलोपार्जित शेती करत असतात.अगदी लहानपणापासून त्यांना शेतीचा छंद आहे.परंतु,व्यवसाय मुंबईत असल्याने गावाकडे भाऊ शेती पाहत असतात.व्यवसायात एका विशिष्ट स्टेजला पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाकडे व्यवसायाची जबाबदारी देत २०१२ मध्ये शेतीकडे वळण्याचे ठरवले.गावाकडील शेती ही निसर्गावर अवलंबून व त्यातही ठराविकच पारंपारिक पिक पध्दतीनुसार त्यांनी येथील कायम संकटात असलेला विष्णू कदम यांनी जाणून आपल्या शेतात फळबाग लागवडीचा नाविण्यपूर्ण प्रयोग राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
केवळ समुद्र किनारीच काजू पिकू शकतो ही संकल्पना खोडून काढण्यासाठी सुरुवातीलाच त्यांनी काजूची ५० रोपे आणून त्याची लागवड केली.योग्य संगोपन व व्यवस्थापन केल्याने चार वर्षांत म्हणजे २०१६-२०१७ मध्ये त्या काजूला उत्तम फळधारणा झाली.त्यामुळे त्यांनी अर्धा एकर क्षेञावर जवळपास २५० रोपांची लागवड केली.केवळ काजूच नाही तरत्यांनीतीनएकरक्षेञावरआंबे,फणस,पेरू,दालचिनी,कोकम,आवळा,कागदी लिंबू,अंजिर,मसाल्याचे पदार्थ अशा एकूण १२०० फळझाडांची लागवड त्यांनी केली.विशेष म्हणजे सर्व रोपे ही कोकणातून आणण्यात आली.रोपांच्या किंमतीपेक्षा वाहतुकीचा खर्च जास्त झाल्याचे ते सांगतात.खडकाल माळरानावर पाण्याचा स्ञोत नसल्याने त्यांनी वर्षाला ५० हजार रूपये एका शेतकर्याला बोलणी करून ६ हजार फुटावरून पाण्याची पाईपलाईन केली आहे.
मागील चार वर्षांपासून ५० काजूच्या झाडांपासून त्यांना दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न सुरू झाले आहे.पुढच्या वर्षी सर्वच फळांच्या झाडांपासून जवळपास वार्षिक २० लाख रूपये उत्पन्न निघेल,अशी अपेक्षा विष्णू कदम यांनी प्रस्तुत प्रतिनिंधीशी बोलताना व्यक्त केली आहे.यासाठी कृृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी रणजित राठोड,कृषी सहायक साहेबराव सोनकांबळे यांचे मार्गदर्शन लाभत वेळोवेळी लाभत आहे.