27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeकृषीअश्वगंधा लागवड पाहणी

अश्वगंधा लागवड पाहणी

ट्वेन्टीवन ॲग्रीच्या ३०० एकर क्षेत्रावरील सेंद्रिय शेती व 

सुगंधी औषधी वनस्पती अश्वगंधा लागवड पाहणीची शिवारफेरी

पारंपरीक पिकांबरोबर वनऔषधी व 

सुगंधी वनस्पती लागवड करावी

सौ. अदिती अमित देशमुख

लातूर (प्रतिनिधी):

  लातूर तालुक्यात शेतकऱ्यांना पारंपरीक पिकांसोबत सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवडीस चालना देण्यासाठी ट्वेन्टीवन ॲग्रीने आंतरराष्ट्रीय आर्युवेदीक कंपनीच्या सोबत पुढाकार घेऊन ३०० एकर क्षेत्रावर अश्वगंधा लागवड केली आहे. लागवड करण्यात आलेल्या अश्वगंधा वनस्पतीची वनस्पती तज्ज्ञ, खरेदीदार प्रतिनिधी यांनी शिवारफेरी करून पाहणी केली, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या भागात वनस्पती शेतीला चालना देण्यासाठी ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका       सौ. अदिती अमित देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना या शेतीतून ५० हजार रूपये ते १ लाख रूपये पर्यंत फायदा होवू शकतो. 

 या अनुषंगाने येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी पारंपरीक पिकाची लागवड करतांना वनऔषधी व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी, असे आवाहन यानिमीत्ताने ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे.

  लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर, मळवटी, महापूर, हरंगुळ बु., हरंगुळ खु., चिखुर्डा, आखरवाई, गातेगाव, मांजरी, सारोळा, कव्हा, जमालपूर येथे शिवार फेरी करून  अश्वगंधा शेतीची पाहणी करण्यात आली. यावेळी अश्वगंधा वनस्पती तज्ज्ञ व कंपनी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना काढणी पश्चात निगा व देखभाल करण्याचे मार्गदर्शन केले.

  ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून सौ.अदिती अमित देशमुख यांनी पुढाकार घेऊन लातूर तालुक्यात वनस्पती शेतीला चालना देण्यासाठी प्रारंभी अश्वगंधा शेतीची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आली. अश्वगंधा पिक येथे यशस्वीपणे घेता येते हे प्रायोगिकरीत्या समजल्या नंतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ३५० एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत ३०० एकर क्षेत्रावर अश्वगंधाची लागवड करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ लातूर तालुक्यातील गातेगाव येथून करण्यात आला होता. 

 आजच्या परिस्थितीत सेंद्रिय शेती व सुगंधी औषधी वनस्पतीची शेती ही महत्वाची आहे. या उत्पादनाला चांगली मागणी आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अश्वगंधा, इतर औषधी व सुगंधी वनस्पतीच्या शेतीकडे वळवण्यासाठी योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्यात आले.

औषधी वनस्पतीची लागवड काळाची गरज

   भागोलीकदृष्टीने येथील परिसर अश्वगंधा वनस्पती लागवडीसाठी अनुकूल आहे. अश्वगंधा पिक कमी पाण्यावर व कमी मेहनतीवर येणारे आहे. सोयाबीन व हरभरा पिकाला पर्यायी पीक म्हणून अश्वगंधाची लागवड करणे फायदेशीर आहे. नवीन लागवड होणाऱ्या उसामध्येही आंतरपीक म्हणून शेतकरी अश्वगंधाची लागवड करू शकतात. येणाऱ्या काळामध्ये सेंद्रिय शेती तसेच आरोग्य व उपचारासाठी औषधी वनस्पतीची लागवड शेतीकडे वळणे गरजेचे आहे. 

लातूर जिल्हयातील इतर तालुक्यात 

अश्वगंधा लागवडीस चालना देण्याचा निर्णय

  ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून लातूर तालुक्यात ३०० एकर क्षेत्रावर अश्वगंधाची लागवड यशस्वीपणे लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या पासून चांगला फायदा होत आहे. लातूर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी अश्वागंधा लागवड योजना राबविण्यात आली. हीच योजना आता ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून जिल्हयातील इतर तालुक्यात राबविण्यात येणार आहे असे ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख म्हणाल्या. 

  या शिवारफेरी प्रसंगी ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन व नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, अश्वगंधा लागवड सल्लागार धनंजय राऊत, व्हिडीएफच्या समन्वयक संगीता मोळवणे, श्रीकांत इंगळे, तानाजी मस्के, कंपनी प्रतिनिधी विनोदकुमार के.एन., सिद्राम एस, शुभम कत्ते, विजय कांबळे, सुरेंद्र गिरी, दिगंबर सुभेदार, गणेश भाकरे, योगेश मुळे, अश्रुबा नरसिंगे, दस्तगिर शेख, प्रतीक सवासे, आकाश सव्वासे, गोंविद देवणे, कृष्णा निमट, दत्तात्रय वाघमारे, अमोल कळसे व अश्वगंधा उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.

———

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]