27.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeराजकीयअहमदपुरच्या बहुआयामी नेतृत्वाना आदरांजली…

अहमदपुरच्या बहुआयामी नेतृत्वाना आदरांजली…

श्रद्धांजली

अहमदपुर तालुका व शहराच्या विकासात महत्त्वाची भुमिका बजावणारे दोन नेते स्व मा सुधाकरभाऊ नागरगोजे व स्व.मा श्री प्रकाश रावजी देशमुख या दोन्ही नेत्यांना आपल्यातुन जाऊन एक वर्ष पुर्ण होतोय सुधाकरभाऊ नागरगोजे म्हणजे सनकि माणुस मनात आणलं आणि त्यांनी केले नाही असं कधीच झालं नाही, मनानं खुप हाळवा माणुस मी महात्मा गांधी महाविद्यालयात शिकायला होतो तेव्हापासूनचा रुनानुबंद भाजप मधुन सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षापर्यत झाला पण नगराध्यक्ष झाले त्यांनतर विधानसभा लढवली पण अपयश पदरात पडत गेलं महाविद्यालयातील निवडणुकीत विजय पराजय होत गेले त्यानंतर हळूहळू त्यांनी राजकारणातुन निवृतीच स्विकारली होती अशा मन्याडच्या वाघाला कोरनोने गाठलं आणि त्यांतच त्यांचा मृत्यू झाला…….
दुसरं बहुआयामी नेतृत्व विकास पुरुष सतत अहमदपुरच्या विकासासाठी प्रयत्नशील अहमदपुरच्या राजकारणातील चाणक्य प्रत्येक आमदार निवडून आणण्यासाठी सिंहांचा वाटा उचलणारे कोणी मानो या ना मानो पण माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांना राजकारणात यशस्वी करण्यासाठी यांचीच महत्वाची भुमिका होती त्यानंतर दोघात वितृष्ठ आले आणि दुसऱ्या निवडणुकीत विनायकराव पाटलाना सलग दोन टर्म पराजित व्हावे लागले,मा प्रकाशराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द नांदुरा बु चे सरपंच ते जिल्हा परिषद लातूर चे बांधकाम सभापती हाडोळती गटातुन मोठ्या मताधिक्याने ते जिल्हा परिषदेत गेले आणि पदाचा वापर करुन हवं ते अहमदपुरला मिळवुन देण्याचा प्रयत्न केला नाही दिलच विशेष प्रेम त्यांचं हाडोळती गटातील युवकांवर त्यांनी गावागावात कार्यकर्ते नेते बनवले, आयुष्यात उभे केले आज ते युवक दिशाहीन आहेत, ज्यांना गावाच्या बाहेर यायचं कळतं नव्हते त्यांना जिल्हा परिषद दाखवणारा एकमेव नेता सरपंच संघटनेचे अध्यक्ष ते जिल्हा परिषद सभापती थक्क करणारा प्रवास राजकिय वारसा नसताना एक नेतृत्व निर्माण होण सोप नसत पण प्रकाशराव भविष्यातील अहमदपुरच्या मनातील आमदार मंत्री भाग्यविधाते होते पण नियतीला ते मान्य नव्हते कि काय असो म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असंच काहीसं…..
कोरोना काळ असल्याने शेतात सर्व कुटुंबीयांसोबत बसले असताना अचानक छातीत दुखायला लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली……
अशा या विकासपुरूषाना भावपूर्ण आदरांजली.

सहदेव होनाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]