निलंगा येथे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ‘ अँग्रोवन मार्टचे ‘ उद्गघाटन
निलंगा,—( प्रशांत साळुंके )—शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी खरे मालक असलेल्या शेतकऱ्यांनी शेतातील मालाच्या प्रक्रियेसाठी कंपन्या स्थापन कराव्यात असे अवाहन करून तात्कालिन सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे मत माजी पालकमञी तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अँग्रोवन मार्टच्या उद्गघाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर होते. तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके,कृषी सभापती गोविंद चिलकुरे,नगरध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ श्रीकांत शिंगाडे,चेअरमन दगडू सोळुंके,देवदत्त पाटील डॉ. एस.एस.डीग्रसे,आर.एस.कदम,आर.टी.मोरे,हमीद शेख ,डॉ. लालासाहेब देशमुख,सिनेट सदस्य गुंडेराव जाधव,पंचायत समिती निलंगा सभापती राधा बिराजदार,उपसभापती अंजली पाटील,कृषी विकासअधिकारीएस.एस.चोले,लिंबराज सुर्यवंशी,राजेंद्र सुर्यवंशी आदी जणांची उपस्थिती होती.

माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर पुढे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वत:च्या कंपन्या उभा केल्या पाहिजेत, तरच आर्थिक स्तर उंचावेल तसेच या शेतकरी कंपन्याचे मालक हे शेतकरी आहेत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व अधिकार आता या शेतकरी कंपन्याना दिले असून भविष्यात शेतकरी हिताच्या कंपन्या जास्तीतजास्त उभा केल्या पाहिजेत सोयाबीन प्रक्रिया केंद्राबद्दल उदाशीनता असून त्याला सर्वतोपरी मदत आपण करू असे अश्वासन यावेळी निलंगेकर यानी दिले.

सध्याचे राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत उदाशीन असून मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून भरीव मदत केली आहे.परंतु हे सरकार शेतकऱ्यांना विमा व नुकसानभरपाई मिळवून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.सध्या राज्यात विमा कंपन्यांची मक्तेदारी चालू आहे.विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत.याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे याला वाचा फोडून हे सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते असा आरोप राज्य शासनावर आमदार निलंगेकर यानी केला.नविन तंञज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली प्रगती केली पाहिजे असा सल्ला ही त्यानी शेवटी दिला.
शेतकऱ्यांनी नविन तंञज्ञानाचा वापर करून स्पर्धेत उतरले पाहिजे तर आज शेतकरी टीकू शकेल,शेतकऱ्यांच्या बांधावर लाभ झाला तरच शेतकरी प्रगती करू शकतो अॕग्रोवन मार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत होणार असून अनेक शेतकरी अवजारे एका छताखाली मिळाल्याने मदत होणार आहे.असे नविन गोष्टी आपल्या तालुक्यात होत असतील तर नक्कीच भविष्यात आपण मदत करू असे अश्वासन प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले .
. कार्यक्रमाचे प्रास्तविक आशिष गायकवाड यांनी केले तर सुञसंचलन एम.एम.जाधव,विलास लोभे यानी केले तर उपस्थितांचे आभार व्यक्त अनंत गायकवाड यानी केले.
या अॕग्रोवन मार्टच्या उदघाटन कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक प्रगतशिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











