लातूर -अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांतशाखा लातूर तर्फे आठ मार्च हा जागतिक महिला दिन 8/3/2022रोजी साजरा करण्यात आला .
आदिमाया शक्तीच्या सेवाभाव रूपांचे सत्कार अशी थीम घेऊन आठ महिलांचे सत्कार आणि स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. पूनम नाथानी मॅडम, ए पी आय ठाकूर मॅडम तसेच बालकल्याण समिती अध्यक्ष उमा व्यास , अॅड. शुभदाताई रेड्डी सामाजिक कार्यकर्त्या ( लातूर अर्बन बँकेच्या संचालिका सदस्य) लातूर कोर्ट ड्युटी पोलीस महिला कॉन्स्टेबल या महिलाना सन्मानपूर्वक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

लातूर जिल्हा सत्र न्यायालयातील विधिज्ञ उपस्थित अधिवक्ता महिलाचा गुलाब फूल देऊन सत्कार करण्यात आला .अधिवक्ता पुरुष देखील या कार्यक्रमास उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलने करण्यात आली . अधिवक्ता सौ. मिरा कुलकर्णी देवणीकर यांनी पुराणातील महिला ते आजची महिला तिचे स्थान तसेच न्यायप्रवाहातील महिला त्यांचा प्रवास अश्या विषयाची मांडणी केली .
कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती अॅड. शुभदा ताई रेड्डी यांनी महिलाचे सामाजिक स्थान आणि संघर्ष विषय मांडताना महिलांनी महिलांचे मनोबल वाढवावे प्रगतीपथावरील महिलांचे रस्सीखेच न करता तिला उस्फूर्तपणे सोबत करावी व मनोबल वाढवावे असे प्रतिपादन केले .
अध्यक्षीय समारोप अॅड चिंते मॅडम यांनी केला. आभार प्रदर्शन अॅड.अंजली जोशी यांनी केले. संपूर्ण सूत्रसंचालन अधिवक्ता प्रियांका देशपांडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास महिला अधिवक्ता सौ प्रणाली रायचूरकर, सौ.प्रजाता इनामदार, सुचित्रा कोपले या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला अधिवक्ता तसेच पुरुष अधिवक्ता ज्येष्ठ विधीज्ञ श्रीराम देशपांडे , अधिवक्ता परिषद शाखा लातूर अध्यक्ष अॅड. मनोज कराड,अॅड दयानंद आप्पा मिटकरी, जिल्हा मंत्री अॅड केदारसिंगजी चव्हाण ,अॅड. त्रंबक सरदे, अॅड. प्रणव रायचूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच वीर सावरकर पतसंस्था आणि अॅड विश्वासराव देशमुख यांनी कार्यक्रमास जागा उपलब्ध करून दिली .




