आंतरराष्ट्रीय दंत चिकित्सा आणि मुख आरोग्य परिषदेत
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाच्या सहा संशोधनास आंतरराष्ट्रीय पुरस्कार
लातूर, दि. 16 – आशिया – पॅसिफिक दंत आणि मुख आरोग्य संघटनेच्या वतीने दंत तंत्रज्ञान आणि मौखीक आरोग्यामधिल प्रगती या विषयावर तृतीय आभासी आंतरराष्ट्रीय दंत चिकित्सा आणि मौखीक आरोग्य परिषद नुकतीच घेण्यात आली. या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दोन संशोधकांच्या संशोधनास प्रथम तर चार संशोधकांच्या संशोधनास व्दितीय आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील दंत संशोधकांनी या परिषदेत आपले संशोधन सादर केले.
या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील डॉ. यतीशकुमार जोशी यांनी सादर केलेल्या सामान्य दंतचिकित्सा श्रेणीतील संशोधनास प्रथम पुरस्कार मिळाला तर ओरल ॲन्ड मॅक्सिलोफेशियल पॅथॉलॉजी या विषयावरील डॉ. वर्षा सांगळे यांच्या संशोधनास व्दितीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच दंत वैद्यकीय आणि मॅक्सिलोफेशियल प्रोस्थेटिक्स या विषयावरील डॉ. विजयालक्ष्मी यांच्या संशोधनास व्दितीय, पेरीओ डॉन्टिक्स व सामुदायिक दंत चिकित्सा यावरील डॉ. खुशबु बेझलवार यांच्या संशोधनास व्दितीय पुरस्कार मिळाला असून दंत रोपनातील अडचणी व काळजी यावर डॉ. प्रविण अंधारे तर दंत आजारातील निदानाचे टप्पे या विषयावर डॉ. अजय सोराटे यांनी पोस्टरव्दारे आपले संशोधन सादर केले. या दोन्ही संशोधनास व्दितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले तर आयोजक समिती सदस्य म्हणून डॉ. यतीशकुमार जोशी यांनी काम पाहिले. भविष्यातही अशा परिषदा घेण्यासाठी एमआयडीएसआर दंत महाविद्यालय पुढाकार घेणार असून शिक्षण पध्दती व तंत्रज्ञान यांची देवान-घेवान करुन जगभरातील दंत शाखेत एकसमानता आणणे हा यामागील हेतू असेल, असे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे यांनी सांगीतले. आंतरराष्ट्रीय दंतचिकित्सा आणि मौखीक आरोग्य परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील संशोधनास पुरस्कार मिळाल्याबद्द्ल सर्व संशोधकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील हे या परिषदेचे सहआयोजक होते.