30.1 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeदिन विशेष*आईचा संस्काररुपी आशीर्वाद…!*

*आईचा संस्काररुपी आशीर्वाद…!*

मातृदिन विशेष

जगात कितीही लौकिकदृष्ट्या यश मिळवले तरी त्या यशाला आईचा संस्काररूपी आशिर्वाद नसेल तर ते यश कवडीमोलच समजले जाते …कारण तिने आपल्यामध्ये रूजवलेल्या सुसंस्कारामुळेच जीवनाचा दर्जा उंचावून नवनवी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी लाभते …नऊ महिने पोटात हाडामांसाचा गोळा जीवापाड जपणारी ती किती हालअपेष्टा सहन करत असेल हे तीच जाणे …इतकी सहनशीलता तिच्या अंगी कशी निर्माण होत असेल हे देखील मोठे आश्चर्यय म्हणावे लागेल …
चालते बोलते संस्काराचे विद्यापीठ असणारी आई हीच खरंतर या सृष्टीवरील आपली पहिली गुरू असते … परमेश्वराला प्रत्यक्षात येणे शक्य नसल्यामुळेच त्याने आईच्या रुपातून सृष्टीवर येणे पसंद केले , असे म्हटले जाते …जगात अलौकिक कर्तृत्व सिध्द केलेल्या व्यक्तींच्या यशामागे त्यांच्या आईने केलेल्या अमूल्य संस्काराचा सिंहाचा वाटा आहे… परमेश्वराचे दुसरे रूप म्हणून तिच्याकडे पाहिले जाते …आई या दोन अक्षरी शब्दातच प्रेम , वात्सल्य आणि सृष्टीच्या निर्मितीचे खरे मर्म दडले आहे …


छञपती शिवरायांना जेव्हा आपले गड किल्ले मोघलांच्या ताब्यात देण्याची वेळ आली तेव्हा ते मनाने खूप खचले …ते़व्हा जिजामाता त्यांना म्हणाल्या की ,शिवबा सर्व काही गमावलास तरी चालेल पण मनाची उभारी कमी होवू देवू नकोस … हे मातेचे शब्द एेकताच त्यांना गमावलेले रयतेचे वैभव पुन्हा मिळवण्याची मोठी प्रेरणा मिळाली व त्यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेवून रयतेचे राज्य प्रत्यक्षात साकारले …या उदाहरणामधून जिजामातांनी शिवरायांवर केलेल्या सुसंस्काराचे महत्व कळून येते …याशिवाय धैर्य,धाडस ,विनम्रता अशा नितीमुल्यांची जपणूक करतानाच स्वतःवरील अन्याय दूर करण्यासाठी प्राणपणाने शञूंशी लढण्याची हिंमत देखील त्यांनी दिलेल्या संस्कारातून मिळत रहात असल्याने या संस्कारांचे मूल्य आजदेखील टिकून आहे …
कर्तव्य भावनेने मुलांवर प्रेम करून त्यांच्या पंखात आकाशात यशस्वी भरारी घेण्याचे बळ आणणारी हि केवळ आई आणि आईच असू शकते …म्हणून तर तिची थोरवी गावी तितकी कमीच आहे .तिच्या संस्काराच्या शिदोरीवरच जगातील सर्व आव्हाने समर्थपणे पेलतानाच एक चांगला माणूस जगण्याचे भाग्य लाभणे यातच कृतार्थ आयुष्याची फलश्रृती सामावलेली आहे…आजच्या जागतिक मातृदिनाच्या सर्व मातांना मनापासून खूप खूप शुभेच्छा!

  • सागर बाणदार , इचलकरंजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]