निलंगा-(प्रतिनिधी)-
लातूर जिल्ह्याच्या माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या आक्का फाँऊडेशनच्या आनंदी प्रोजेक्ट माध्यमातून गावागावात पोहचला आहे.
तीन महिन्यांपूर्वी महिलांच्या सशक्ती करणासाठी आक्का फाऊंडेशनच्या पुढाकाराने प्रोजेक्ट आनंदीची सुरवात लातूरचे माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाला करण्यात आली. आणि आज बघता बघता तीन महिने उलटून गेले आहेत. आत्तापर्यंत १३५ शाळेपर्यंत हा प्रोजेक्ट आनंदी पोहोचला असून १० हजार मुलींपर्यंत प्रोजेक्ट आनंदीने जनजागृती केली आहे. महिलांचा सन्मान यातच आमचे समाधान हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्याचे माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून प्रोजेक्ट आनंदी हा उपक्रम लातूर जिल्ह्यात यशस्वीपणे सुरू झाला असून गेल्या तीन महिण्यापासून अनेक शाळा,विद्यालयात पोहचला आहे.समाजामध्ये मासिक पाळी संदर्भात असलेले गैरसमज आणि रूढी परंपरेला फाटा देत उमलणा-या आपल्या पोटच्या कळीची काळजी घेण्यासाठी उचलले हे एक यशस्वी पाऊल आहे.असा प्रतिसाद गावागावात मिळत आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून आणि १३५ शाळा या अभियानाद्वारे पूर्ण केल्यामुळे निलंगा तालुक्यातील भुतमुगळी येथे महर्षी दयानंद विद्यालय येथे कार्यक्रम ठेवला गेला होता.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुलभाताई चव्हाण, भारतबाई सोळुंके माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
राधा बिराजदार माजी पंचायत समिती सभापती,
वनिता चव्हाण सरपंच भुतमुगळी, जनाबाई माने, शितल निलंगे, अशोक कुलकर्णी उपसरपंच
अशोक सावंत चेअरमन,तसेच शाळेचे शिक्षक
प्रा.अशोकराव चव्हाण संस्थापक अध्यक्ष,
अजय मोरे मुख्याध्यापक महर्षी दयानंद विद्यालय
डी. बी. गुंडुरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूतमुगळी मोहन गायकवाड,प्रभाकर खाडगावे विकास सगरे,ज्ञानोबा सोलंकर उपस्थित होते.तसेच ,पूजासरवदे,राहु ला डसचिनसूर्यवंशी सिद्धू डांगे,
मारोती कांबळे यांनी मार्गर्शन केले.

आनंदी प्रोजेक्ट साठी चोहीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपण सर्वजण आनंदी आहोत. या सुवर्णमयी प्रवासाच्या आनंदी प्रोजेक्टमुळे शाळेतील मुलींना जीवन कसे जगावे नैसर्गिक अडचणीवर कशी मात करावी यासंबंधी संपूर्ण माहितीसह सखोल ज्ञान देण्यात आले असून याचा फायदा मुलींना होणार आहे.
