महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळातील लालपरीतील कामगारांच्या कुटुंबियांचा आक्रोश मोर्चा
राज्य शासनाला साकडे, कसे जगावयाचे ते सांगा आता तरी..!
निलंगा,-( प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाकडून सलग 17 व्या दिवशी अद्यापही तोडगा न निघाल्याने राज्य शासानामध्ये विलगीकरण करा,या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निलंगा आगारातील एस.टी.कामगाराच्या कुटुंबियांनी आगारावर आक्रोश मोर्चा काढत आंदोलनात सहभाग नोंदविला.
एस.टी.मधील वाहक-चालक,कामगाराला तुटपूंज्या पगारीवर जोखीम पत्करून प्रवाशांच्या सुखासाठी राञपाळी सेवाभाव देणार्या एस.टी.कामगारांनी मळामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करा,या मागणीसाठी मागच्या 17 दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.अद्यापही राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याने शनिवारी निलंगा आगारावर एस.टी.कामगारांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आक्रोश मोर्चा काढत दिवसभर आंदोलनात सहभाग घेतला.
जोपर्यंत विलगीकरणाची मागणी मान्य होत नाही,तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका चालक विजयकुमार सुर्यवंशी यांनी बोलून दाखविली आहे.











