सोलापूर,(प्रतिनिधी):- निवेदक स्वर्गिय जॉन येवलेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त देण्यात येणारा जॉन येवलेकर राज्यस्तरीय उत्कृष्ठ निवेदक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.
मुंबईचे विघ्नेश जोशी, सोलापूरच्या मंजुषा गाडगीळ आणि शीला अडसूळे कांबळे यांना जाहिर करण्यात आला असून प्रसिध्द अभिनेते विजय गोखले यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार असून यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.

उर्दु,हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेतून निवेदन करून प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप उमटरवणारे हरहुन्नरी कलाकार निवेदक जॉन येवलेकर यांनी जॉनी अॅन्ड हिज ऑर्केस्ट्रा या नावाने मोठ्याप्रमाणात कार्यक्रम केले. त्यांच्या निवेदन कौशल्यावर प्रभावित होवून अनेकांनी आपले करियर निवेदनातून सुरू केले. म्हणूनच अशा उत्कृष्ठ निवेदकांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचे सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानने ठरवले त्यानुसार मागील वर्षी अकबर शोलापुरी, शोभा बोल्ली, सुनिता पॉल आणि स्वप्नील रास्ते यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले यंदाचे हे पुरस्काराचे दुसरे वर्ष असून यंदाच्या वर्षी नाट्य,चित्रपट अभिनेता, लेखक आणि निवेदक विघ्नेश जोशी, निवेदिका मंजुषा गाडगीळ आणि निवेदिका शीला अडसुळे यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला असून ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते महाराष्ट्र रंगभूमी परिनिरीक्षण अध्यक्ष विजय गोखले यांच्या हस्ते सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
या कार्यक्रमाला दि फर्स्ट चर्च सोलापूरचे धर्मगुरू रेव्ह.विकास रणशिंगे, एच सी सी चर्च सोलापूरचे धर्मगुरू रेव्ह. इमॅनुएल म्हेत्रे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. असेही सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानच्या सचिवा रूपश्री येवलेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जॉन येवलेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष फिलीप नदवी, उपाध्यक्ष शशिकुमार तेलंग, सहसचिव मंजुश्री येवलेकर, खजिनदार तेजश्री येवलेकर, सदस्य किरणकुमार इरनाळे, मायकल नदवी हे उपस्थित राहणार आहे.
—