बी. व्ही. निंबकर यांचें निधन
फलटण.. :बी.व्ही.निंबकरशास्त्रज्ञ होते. निंबकर एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टीट्यूटची, फलटण या संस्थेचे एक संस्थापक.
बंगालमधील सुंदरबनातील मेंढीमधील Booroola हा जनुक त्यांनी लोणंदच्या मेंढीच्या जनुकामध्ये रुजवला. त्यातून नारी सुवर्णा नावाची मेंढीची नवी जात निर्माण झाली. या मेंढीची उंची अधिक असते, दखनी मेंढीपेक्षा अधिक वेगाने तिची वाढ होते आणि तिला जुळं होण्याची शक्यता दुपटीने वाढते. साहजिकच पशुपालकाला या मेंढीपासून भरपूर फायदा होतो.
आफ्रिकेतील बोअर शेळीपासून नवी संकरीत जातही या संस्थेने विकसित केली. बोअर शेळीची वाढही वेगाने होते आणि सेंद्रीय पदार्थांचं (पाला-पाचोळा, गवत, इत्यादी) रुपांतर प्रथिनांमध्ये (मांस) करण्याची कार्यक्षमताही वाढते.
नारी सुवर्णा आणि संकरीत बोअर या दोन शेळ्यांची वाणं महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यातील हजारो पशुपालकांना (यापैकी बहुतांशी धनगर), विशेषतः महिलांना पुरवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली.
निंबकर एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टीट्यूटने शेतीमध्ये मूलगामी संशोधन केलं आणि शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ केली. आधुनिक विज्ञान व समुचित तंत्रज्ञान याद्वारे ग्रामीण विकास हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. या कार्याबद्दल बी. व्ही. निंबकर आणि संस्थेला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
हजारो महिला, धनगर आणि शेतकरी यांच्या आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडवणार्या बी. व्ही. निंबकर यांचं निधन झाल्याची बातमी सजल कुलकर्णीच्या भिंतीवर वाचली आणि सुन्न झालो. बी. व्ही. निंबकर यांना मनःपूर्वक आदरांजली.











