आदर्श शिक्षक पुरस्कार

0
411

 आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ; निलंगा येथे जिल्हा परिषदेच्या ३७ शिक्षकांना आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित..

निलंगा,-(प्रतिनिधी)- निलंगा पंचायत समितीच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सन २०२०-२१ मधील १८ शिक्षक व सन २०२१-२२ मधील १९ शिक्षक अशा एकूण ३७ शिक्षकांना माजी पालकमंत्री तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर चांगली कामगिरी करणाऱ्या १७ जिल्हा परिषद शाळांना आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती राधा बिराजदार, व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, माजी सभापती संजय दोरवे, उपसभापती अंजली पाटील, जि.प.धोंडीराम बिराजदार,अरुणा बरमदे,सुरेंद्र धुमाळ, माजी पं.स. सभापती अजित माने, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे, बापूसाहेब राठोड, राजा पाटील, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, पं.स सदस्य महेश देशमुख, रमेश जाधव, उर्मिला जाधव, वामन भालके, संजय हलगरकर आदी उपस्थित होते.

यात सन २०२०-२१ मधील अरुण चरपल्ले, शरणाप्पा सुरमी, शालीवाहान डोंगरे, कांताबाई जगताप, शिवाजी जाधव, शिवाजी राठोड, खुशाल गोरे, जगन्नाथ कदम, सुभाष सगर, गणेश दाडगे, प्रशांत इंगळे, जयश्री शिंदे, रामराव तोरे, पुंडलिक बिरादार, शशिकांत शेरीकर, सरस्वती नागमोडे, सिताराम शिंदे, माधव हालकरे, सन २०२१-२२ मधील मनोहर कुलकर्णी, वर्षाराणी शेरे, सुनील कंठाळे, बालाजी मामीलवाड, रमेश बिराजदार, उर्मिला कदम, उध्दव मुंडे, अशोक शिंदे, गोविंद भुमकर, गौतम कांबळे, सुनिता सुरवसे, रमेश कोळसुरे, विजया नरवणे, महेश बिराजदार, चंद्रकांत शिंदे, दिपीका कुलकर्णी, विजयकुमार मुंडे, संजय सुर्यवंशी, अरुण गायकवाड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर बाला उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा शाळा तांबाळा, भुतमुगळी, नदीहत्तरगा, तगरखेडा, चांदोरीवाडी, झरी, नेलवाडे, कन्या शाळा कासारसिरसी, ममदापूर, केळगाव, निटूर मोड, नणंद, जेवरी, मुगाव हत्तरगा (हा) या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here