27.6 C
Pune
Thursday, June 12, 2025
Homeशैक्षणिक*आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आयआयबी देणार “नीटसाठी” मोफत प्रशिक्षण*

*आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आयआयबी देणार “नीटसाठी” मोफत प्रशिक्षण*


गोंदियाचे पोलीस अधीक्षक आयपीएस निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम


नांदेड ;दि..(प्रतिनिधी) ता १३ जुलै २०२३
श्री. निखिल पिंगळे यांच्या हस्ते उदघाटन आणि विद्यार्थ्यांना तात्काळ आयआयबी कडून प्रशिक्षण सुरु करण्यात आले…
दिनांक १३ जुलै रोजी या संयुक्त उपक्रमाचे उद्घाटन . श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री.दशरथ पाटील व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट चे समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या निःशुल्क ऑनलाइन नीट क्लासेस चा उद्घाटन गुगल मिट व्हिडिओ कन्फरंस द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी संचालक श्री.दशरथ पाटील व टीम आयआयबी ची उपस्थिती होती.


नीट परीक्षेबद्दल माहिती…
नीट (एनईईटी) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी प्रवेश पूर्व पात्रता परीक्षा म्हणजे नीट होय. राष्ट्रीय-स्तरीय परीक्षा एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे प्रशासित केली जाते. या परीक्षेचे प्राथमिक ध्येय विद्यार्थ्यांना वैद्यकीय कार्यक्रमात प्रवेश देणे हे आहे. एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी), बीडीएस (दंत शस्त्रक्रिया बॅचलर) इत्यादी कार्यक्रमांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी तुम्हाला नीट (एनईईटी) चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच इतर अनेक अभ्यासक्रमांसाठी नीट परीक्षा देणे अनिवार्य आहे.


दादालोरा खिडकी अंतर्गत गोंदिया पोलीस दलाच्या उपक्रमाला आयआयबी ची साथ, काय आहे दादालोरा उप्रकम
गोंदिया पोलीस दलाकडून आदिवासी, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी या खिडकीची सुरुवात करण्याचा हेतू म्हणजे, या दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून आदिवासी जनतेला विविध शासकीय योजना, शासकीय दाखले, उच्च दर्जाचे कृषी बियाणे, रोजगार व स्वयंरोजगार या सोबत विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश या खिडकीच्या माध्यमातून राबिवणे हा होता. लवकरच या योजनेला लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद व सहभाग दिसून आला त्यानंतर सर्व पोलीस / उप पोलीस स्टेशन व पोलीस मदत केंद्र च्या ठिकाणी पोलीस दादालोरा खिडकी तयार करण्यात आली.



सामाजिक कार्यात अग्रेसर, आदर्श आयआयबी !


आयआयबी कडून गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालय आणि भामरागड येथे लोकबिरादरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नीट साठी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील स्वप्नभूमी येथील अनाथ विद्यार्थ्यांना देखील मोफत प्रशिक्षणासाठी आयआयबी कडून मोफत ऑनलाईन शिकवणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी सोबत इतर हजारो विद्यार्थ्यांना फीस मध्ये अधिकाधिक सवलत देण्याचे कार्य आयआयबी करते. जेणेकरून ग्रामीण भागातील होतकरू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या स्वप्नांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये याकरिता आयआयबी विद्यार्थ्यांप्रती व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता सहकार्याची भावना जोपासत वाटचाल करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]