माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते उद्धघाटन..
निलंगा-(प्रशांत साळुंके)-– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित सावरी येथील आनंदी महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या वतीने पंचायत समिती निलंगा येथे घरकुल डेमो हाऊस मध्ये सुरू करण्यात आलेल्या आनंदी झेरॉक्स व स्नॅक्स सेंटरचा शुभारंभ माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

उमेद बचत गटातील महीलाना कायमस्वरूपी उपजीविकेची संधी निर्माण व्हावी व त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने निलंगा पंचायत समिती आवारातील घरकुल डेमो हाऊस मध्ये सावरी येथील आनंदी महिला बचत गटाने सुरू केलेल्या झेरॉक्स व स्नॅक्स सेंटरचां शुभारंभ आज करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतीताई सोळुंके या उपस्थित होत्या. गावच्या विकासात महिलांचे महत्त्वाचे योगदान असून महिलांनी ग्रामीण भगतील परांपरिक उत्पादनांना आधुनिकतेची जोड देऊन मिळणाऱ्या संधीच सोन करावं असे उपस्थित महिलाना उद्द्घाटक रुपालीताई पाटील निलंगेकर यांनी महिलाना संबोधित केले. यावेळी जि.प उपाध्यक्षा भारतीताई सोळंके यांनी बचत गटाच्या माध्यमातून एक सक्षम महिला नेतृत्व निर्माण होऊन त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन गटाच्या CRP यांनी उमेदचे गावस्तरावर सर्वसमावशक काम करून आपल्या कामाला न्याय द्यावा असे विचार व्यक्त केले.

प्रसंगी गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी आज बचत गटातील महिलांची केवळ आर्थिक सक्षमताच झाली नाही तर सामाजिक सक्षमता ही तेवढीच निर्माण झाली असून बचत गटातील महिला या आज ग्रामविकास आणि पंचायत राज संस्थेची मोठी ताकत आहेत असे मत व्यक्त करून महिलाना शुभेछा दिल्या.जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी उमेद मार्फत मिळणाऱ्या विविध निधीचा महिलांनी उपजीविका वृद्धीसाठी नियोजनबध्द वापर करून आपल्या उत्पादनांची उत्कृष्ठ पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग करून तालुका,जिल्हा व इतर मोठ मोठ्या बाजारपेठेत आपल्या उत्पन्नाची स्वंतत्र ओळख निर्माण करावी असे महिलाना मार्गदर्शन करून आनंदी झेरॉक्स व स्नॅक्स सेंटर उद्योगास शुभेच्छ दिल्या. यावेळी उपस्थित शेषराव ममाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या वतीने माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी केले. तर आभार प्रदर्शन दत्ता शिंदे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका व्यवस्थापक शरद स्मुखराव,अरुण शाहीर, प्रभाग समन्वयक सचीतानंद आयनीले, गोविंद रावते,त्रिंबक लहाने तसेच ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास तालुक्यातील CRP, गटाच्या महिला व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.