आमदारांच्या निलंबना विरोधात लातूर मध्ये भाजपचे निदर्शने…
लातूर – भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केल्याने या निलंबना विरोधात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.यावेळी आंदोलन कर्त्याना काही वेळेसाठी पोलिसांनी ताब्यात घेवून घेतले होते.यावेळी ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.
विधीमंडळ अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर याचे तीव्र पडसाद लातूर जिल्ह्य़ात पडले असून दि. ६ जुलै रोजी जिल्हयात ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलन केले.यावेळी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात भाजप पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार विरोधात फलक झळकावून निषेध व्यक्त केला.यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून पुन्हा त्यांची सुटका करण्यात आली.यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देविदास काळे,महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सौ.स्वाती जाधव, संघटनमंत्री शिरीष कुलकर्णी,युवा मोर्चा प्रदेश सचिव दत्ता चेवले,युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य रविशंकर केंद्रे, सुरेश राठोड, गोपाळ वांगे, लातूर ग्रामीण मंडळ अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, आदित्य कासले, ओम धरणे, ऋषी जाधव, शुभम मोरे, स्वराज यादव,प्रसाद जगताप,सौ.प्रगती डोळसे,सौ.ज्योती मारकडे, भरत लोंढे, गिरीष तुळजापूरे, जमीर शेख,सौ.अनिता रसाळ,सौ शोभा कोंडेकर,सौ ज्योती रसाळे,सौ रत्नमाला घोडके,सौ आफरीन खान,सौ रोहिनी देशमुख, आनंत आरसनाळकर, प्रशांत माने, नंदकुमार कुलकर्णी आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…











