औसा पॅटर्न मराठवाड्यात मॉडेल म्हणून उदयास येत आहे – माजीमंत्री बसवराज पाटील..
बसवराज पाटील यांच्या भेटीला आमदार अभिमन्यू पवार…
औसा – ( वृत्तसेवा )-विकासाच्या प्रश्नावर आमदार अभिमन्यू पवार यांनी पक्षभेद कधी ठेवला नव्हता. कुठलाही प्रश्न आला की ते फोन करायचे. त्यांच्या रुपाने योग्य लोकप्रतिनिधी लोकांनी निवडल्याचे जाणवले. या पदाला न्याय देणारा हा आमदार आहे. राजकारणात समाजकारण आलं पाहिजे. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण करणारे आमदार अभिमन्यू पवार यांच्या कामाचा झपाटा, वरिष्ठांकडे असलेले वजन आणि त्यांनी निर्माण केलेला औसा पॅटर्न मराठवाड्यात मॉडेल म्हणून उदयास येत असल्याचो गौरवोद्गार माजीमंत्री बसवराज पाटील यांनी काढत आमदार अभिमन्यू पवार पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

माजीमंत्री बसवराज पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतल्यानंतर (दि.२) मार्च रोजी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांचा भाजप पदाधिकाऱ्यांसह जावून सत्कार केला यावेळी स्वागत कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांचे तोंडभरून कौतुकही केले. यावेळी बोलताना बसवराज पाटील यांनी आमदार पवारांच्या कामाचा झपाटा, औसा पॅटर्नचा उल्लेख करत ते पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. माझ्यासाठी हे स्वागत म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम आहे. आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत. अभिमन्यू पवार मला भेटायला येणे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता १० वर्षे आपण औसा तालुक्यात राजकारण केले. लोकांनी भरभरून प्रेम दिले, हे औसेकरांचे उपकार विसरणे शक्य नसल्याच्या भावना बसवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त करीत आशा पध्दतीने काम होत राहीले तर औसा तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल, लोकांना न्याय मिळेल, पदाला न्याय मिळेल आणि संपूर्ण मराठवाड्यात सर्वात जास्त मताधिक्याने आमदार अभिमन्यू पवार निवडून येतील आशा प्रकारचे या सर्व गोष्टी विचारात घेतल्यानंतर लोक निश्चितपणाने आपल्या पाठीशी राहतात आपण ज्यावेळेला लोकांना प्रेम देतो घेतो आणि विकासाच्या कामांमध्ये सर्वाना सहभागी करून घेतो त्यावेळेला लोक आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाहीत असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे.विकासाकडे देशाची वाटचाल सुरू आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला कसं न्याय देता येईल आणि या देशाचे नाव जगात नावलौकिक करता येईल यासंबंधीचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यसुद्धा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे असे माजीमंत्री बसवराज पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की बसवराज पाटील यांचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण मराठवाड्याच्या राजकारणाला कलाटणी देणार निर्णय आहे. धाराशिव, लातूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात तर मोठी पकड आहेच याचबरोबर सोलापूर, नांदेड या भागासह बिदर, भालकीसह गुलबर्गा याही ठिकाणी कर्नाटक च्या भाजप पक्षाला मोठा फायदा होणार आहे. देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागच्या काळात प्रगती झाली असून आजही होत आहे. त्या विकासाकडे बघून भाजप पक्षात प्रवेश केला आहे असे बसवराज पाटील यांनी म्हणत तुम्ही काही काय द्याल अथवा न द्याल याचा विचारही केला नसल्याचे त्यांनी मोठ्या मनाने सांगितले.यावेळी मोठ्या संख्येने औसा मतदारसंघासह धाराशिव, सोलापूर व कर्नाटक येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





