आ. कराड यांच्या प्रयत्नातून मुरुड उपजिल्हा रुग्णालय
इमारत बांधकामास २५ कोटी ४७ लाखाचा निधी मंजूर
लातूर दि.०७– लातूर तालुक्यातील मुरुड येथील उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून २५ कोटी ४७ लक्ष रुपयाचा निधी महाराष्ट्रातील महायुतीच्या शासनाने डिसेंबर २०२३ पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून त्यापैकी २०२३-२४ या वर्षाकरीता १ कोटी ५४ लक्ष ७४ हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मुरुड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन विशेष बाब म्हणून गेल्या ४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मान्यता दिली. मुरुड येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आ. रमेशआप्पा कराड यांनी निधीची तरतूद व्हावी यासाठी संबंधित मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी, तोंडी वेळोवेळी मागणी करून पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव ११ जुलै २०२३ रोजी झालेल्या उच्चाधिकार सचिव समितीच्या बैठकीत २५.४७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास सहमती दर्शविली. उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार मुरुड उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम अंदाजपत्रकास १ ऑगस्ट २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरात लवकर मुरुड उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकाम व इतर कामाकरिता अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध व्हावा याकरिता आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर कामासाठी २५ कोटी ४७ लाख रुपयेची डिसेंबर २०२३ पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून त्यापैकी २०२३-२४ या वर्षाकरीता १ कोटी ५४ लक्ष ७४ हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने मुरुड उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
मागणी केल्यानुसार निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे आरोग्यमंत्री मा. तानाजी सावंत साहेब यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मुरुड उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम होणार असल्याने मुरुड आणि परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णालयांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे भाजपाचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वैभव सापसोड, मुरुडच्या सरपंच सौ. अमृता नाडे, उपसरपंच हनुमंतबापू नागटिळक, सुरज शिंदे, अनंत कणसे, लताताई भोसले, महेश कणसे, रवि माकुडे, विशाल कणसे, वैजनाथ हराळे, रवि नाडे, रमाकांत गायकवाड, जनक इंगळे, विश्वास कावळे, काशीनाथ ढगे, बालाजी दुटाळ, शुभम खोसे, दत्ता पोटभरे, आकाश सापसोड, रमजान सय्यद यांच्यासह मुरुड आणि परिसरातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.