मूलभूत सुविधांसाठी पाच कोटींचा निधी
आमदार धिरज देशमुख यांच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी
—-
लातूर :
ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी पाठवलेला प्रस्ताव मान्य करीत राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून लातूर ग्रामीण मतदारसंघातील ७१ गावांत सभागृह, सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली बांधकाम अशी विविध विकासकामे होणार आहेत.
सरकारकडून विविध विकासकामे मंजूर करून आणण्यासाठी आमदार श्री. धिरज देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच लातूर ग्रामीण मतदारसंघात सध्या अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यातच आता आणखी ५ कोटींच्या विकासकामांची भर पडली आहे. याबाबत आमदार श्री. धिरज देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता. त्यांनी दिलेल्या मंजुरीमुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या लातूर तालुक्यातील ३२ गावात २ कोटी ५४ लाख रुपयांची, रेणापूर तालुक्यातील ३१ गावात १ कोटी ८५ लाख रुपयांची तर औसा तालुक्यातील ८ गावात ६१ लाख रुपयांची कामे होणार आहेत.

रेणापूर तालुक्यातील जवळगा (७ लाख), कारेपुर (८ लाख), घनसरगांव (७), डिगोळ देशमुख (९), खरोळा (१०), फरदपुर (५), माकेगांव (९), खानापुर (८), भोकरंबा (८), गोढाळा (३), डिघोळ देशपांडे (५), रामवाडी को (३), सुकणी (७), शेरा (५), आरजखेडा(७), वांजरखेडा (१०), आंदलगाव (७), सिंधगाव (७), गव्हाण (५), दर्जीबोरगाव (७), पानगाव (१०), रामवाडी पा. (३), नरवटवाडी (३), व्हटी नं.1 (५), कोष्टगाव (५), तत्तापुर (५), चाडगाव (३), पाथरवाडी (३), रामवाडी ख. (५), सय्यदपुर बु. (३), दिवेगांव (३) या गावातील विकासकामे मंजूर झाली आहेत.
औसा तालुक्यातील सिंदाळा लो. (१० लाख), टेंबी (८ लाख), ब-हाणपुर (८), येल्लोरीवाडी (३), काळमाथा (७), कोरंगळा (५), लखनगांव (१०), उटी बु. (१०) या गावांमधील तर लातूर तालुक्यातील चिखुर्डा (१० लाख), मुशिराबाद (७), बामणी (५), रमजानपुर (५), ममदापूर (७), एकुर्गा (१०), बिंदगीहाळ (५), सलगरा खु (१०), गुंफावाडी (५), शिवूर (५), साखरा (१०), बोरगाव बु. (१०), मसला (१०), तांदुळवाडी (८), सामनगाव (१०), कासारखेडा (१०), शिवणी खू (१०), माटेफळ (८), नागझरी (१०), बोकनगाव (१०), भाडगाव (५), गाधवड (७), सावरगाव (५), ढोकी (७), शिराळा (१०), निवळी (७), वाडी वाघोली (७), पिंपळगाव अंबा (५), मळवटी (३०), गोंदेगाव (६.२५) या गावातील कामांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ, पालकमंत्री श्री. अमित देशमुख, आमदार श्री. धिरज देशमुख यांचे आभार मानले.
—