आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी नवी परंपरा सुरू करून इतरांना दिली प्रेरणा
लातूर (माध्यम वृत्तसेवा ) :–सर्वसाधारणपणे वाढदिवसाच्या निमित्ताने आई मुलाचे औक्षण करत असते परंतु कधी मुलांनी आईचे औक्षण करून शुभेच्छा दिल्याचे आपण पाहिले नव्हते. मात्र औसा ग्रामीण मतदार संघातील आमदार धीरज देशमुख यांनी आपल्या मातोश्रीच्या वाढदिवसाच्या औक्षण करून नवीन परंपरा सुरू करून इतरांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

2019 साली लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आई (वैशालीताई) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे औक्षण केले होते. औक्षण करतानाचा तो क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. असंख्य लोकांनी या कृतीचे कौतुक देखील केले होते. आईच्या प्रती आपली असलेली श्रद्धा व प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करण्याची ही पद्धत डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी याचे अनुकरण केले. आईच्या वाढदिवसानिमित्त औक्षण करून अनेकांनी शुभेच्छा दिल्याचे आपण अनेकदा पाहीले व ऐकले आहे.

आई आणि मुलाचं असलेल्या नात्यास अधिक घट्ट करत एक नवी परंपरा यातून सुरू झाली. आज दि. 10/10/2024 रोजी आपल्या बाभळगाव निवासस्थानी आमदार अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांनी श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या व्यक्तिमत्वातचा हा पैलू सर्वांना मनापासून भावला असून एक नवी परंपरा व चांगली संस्कृती रुजवण्याचे काम आमदार धिरज देशमुख करत असल्याचे दिसून येत आहे.
