25.2 C
Pune
Thursday, December 18, 2025
Homeराजकीयआमदार धिरज देशमुख यांनी लातूरच्या पाणी प्रश्नाकडे वेधले शासनाचे लक्ष

आमदार धिरज देशमुख यांनी लातूरच्या पाणी प्रश्नाकडे वेधले शासनाचे लक्ष

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्परतेने सोडवण्याची अधिवेशनात मागणी

लातूर :

“लातूरमधील पाणी टंचाईचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे आता पाणी कुठूनही आणा; पण लातूरच्या पाण्याचा प्रश्न यापुढे अधिक तत्परतेने सोडवा”, अशी मागणी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सोमवारी (ता. 14) अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. राज्य सरकार हा प्रश्न नक्की सोडवेल अशी आम्हाला आशा आहे, असेही ते म्हणाले.

लातूरमधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधले. ‘महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू’, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा विषय जलद गतीने सोडवावा. कारण पाण्याचा समान वापर, हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.

धिरज देशमुख म्हणाले, 2016मध्ये भीषण टंचाई होती, त्यावेळी कृष्णेचे पाणी लातूरला ट्रेनने आणण्यात आले. पावसाअभावी दर तीन-चार वर्षांनी लातूर जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती पहायला मिळत आहे. लातूरची जीवनवाहिनी असलेले मांजरा धरणही अनेकदा कोरडे राहत आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी सरकार कुठल्या योजना आखत आहे. ‘जलजीवन’चा मोठा गाजावाजा केला जातो. प्रत्येकाला 55 लिटर पाणी द्यायचे असेल तर तेवढे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी सरकार कोणती पावले टाकत आहे,असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]