रेणापूर -( प्रतिनिधी )
लातुर ग्रामीण आमदार तथा लातुर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणापुर शहर कॉग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
इंडियन मेडिकल असोसिएशन व रेणापुर शहर व तालुका कॉंग्रेसच्या वतीने लातुर ग्रामीण आमदार तथा लातुर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि. ६ रोजी सकाळी ९ वा. रेणापुर येथील रेणुका देवी मंदिर सभागृहात मोफत सर्वरोग निदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरासाठी तज्ञ डॉक्टर लातुर येथील तज्ञ डॉक्टर्स डॉ. कल्याण बरमदे,डॉ. सुधीर फत्तेपुरकर ( न्यूरोसर्जन ) ,डॉ. विश्रांत भारती ( फिजीशअन ) डॉ. रमेश भराटे, डॉ. गणेश स्वामी ( जनरल सर्जन ) ,डॉ. प्रताप पन्हाळे ( मानसोपचार तज्ञ ) , डॉ. संदिपान साबदे ( बालरोग तज्ञ ),, डॉ. वैशाली दात्ताळ डॉ मनिषा बरमदे , डॉ. संगिता देशमुख ( स्त्रिरोग तज्ञ ) डॉ. प्रदिप इंदालकर ,
डॉ. संजय शिवपुजे ( हदयरोग तज्ञ ) , डॉ. अमोल गवारे ( अस्थिरोग तज्ञ ) , डॉ. नारायण देशमुख , डॉ. आनंद कर्नावट , डॉ. संजय भोसले यांच्यासह अदि. डॉक्टर येणार आहेत.
तरी गरजू रुग्णानी या शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेणापुर शहर व तालुका कॉग्रेस वतीने करण्यात आले आहे.

रेणुका मंदिर येथे महाभिषेक
लातुर ग्रामीण आमदार तथा लातुर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख याना दिर्घ आयुष्य लाभो यासाठी रेणापुर शहर व तालुका कॉग्रेसच्या वतीने
श्री. रेणुका मंदिरात महाअभिषेक करण्यात येणार आहे.