१२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण; आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा उपक्रम
लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रूग्णवाहिकांचे केले उदघाटन…
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाढदिवस अन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त निलंगा येथील भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी १२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले.
१७ सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दोन्हीचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील भाजपचे आमदार तथा माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर व लातूर जिल्ह्याचे खा.सुधाकर शृंगारे यांच्या स्थानिक विकास निधीतून निलंगा तालुक्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका दिली आहे.

याचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला यावेळी खासदार सुधाकर शृंगारे उपस्थित होते कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेता गावखेड्यात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे राज्यात बारामती हा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका असलेला पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला असून त्यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ हा निलंगा ठरलाय जिथं सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका उपलब्धता झाली आहे नक्कीच कोरोना असो की संकट काळ नक्कीच या रूग्णवाहिकांचा फायदा सामान्य जनतेला होणार आहे असा विश्वास आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.हा लोकार्पण सोहळा निलंगा पंचायत समितीच्या आवारात पार पडला यावेळी दोन दिव्यांग व्यक्तींना चार्चिंग सायकलही देण्यात आल्या.दिव्यांग व्यक्तींना आ.निलंगेकर यांनी जपून सायकल चालवावी म्हणत काळजी घेण्याची विनंती केली.तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छाही दिल्या…

या लोकार्पण सोहळ्याला जि.प.उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके,कृषी सभापती गोविंद चिलकुरे,नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,उपनगरध्यक्ष मनोज कोळ्ळे,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव ,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे,तहसिलदार गणेश जाधव ,गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,निलंगा उपजिल्हा रूग्णालयाचे अदिक्षक दिलीप सौंदळे,तालुका आरोग्य अधिकारी प्रदिप जाधव ,जि.प.सदस्य संतोष वाघमारे ,संजय दोरवे,न.प.सभापती इरफान सय्यद,प.स.सभापती राधा बिराजदार,उपसभापती अंजली पाटील,प.स.गोकर्णा पाटील,हरीभाऊ काळे,कालीदास पाटील,उर्मिला जाधव,रमेश जाधव,अजित माने,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एका रूग्णवाहिकेचा ताबा घेत संपूर्ण निलंगा शहराला वळसा घातला व जनसेवेत १२ रूग्णवाहिका समर्पित केल्या.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनादिवशीच पालकमंञी गायब आ.निलंगेकर यांनी केला निषेध ….
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले ध्वजारोहण,
संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या आनंदाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो परंतु लातूर इथं पालकमंञी अमित देशमुख यांच्या गैरहजेरीत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते हुतात्मा स्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे मनपा आयुक्त अमन मित्तल उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या गैरहजेरी बद्दल निलंगा येथील भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी तीव्र टीका केलीय मराठवाड्याला निजामाच्या जुलुमी राजवतीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्राणांची बाजी लावत बलिदान केले त्याच्या आठवणीत साजरा होत असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला खुद्द पालकमंञीच गैरहजर राहिल्याने जनता त्यांना माफ करणार नाही असा संताप आमदार निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.











