*मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल*
आ.संभाजी पाटील निलंगेकरांची टीका
निलंगा,-(प्रशांत साळुंके)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुक्तीसंग्राम दिनी संभाजीनगर येथे आलेले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विकासाबाबत कोणतीही ठोस घोषणा न करता भावी सहकारी असे शब्द वापरून मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे पाप केले असा आरोप माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
मुक्ती संग्राम दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठवाड्याच्या विकासासाठी काय घोषणा करणार इकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण त्यांनी विकासावर कांहीच न बोलता किंवा मराठवाड्याच्या विकासाच्या कोणत्याही योजना जाहीर न करता भावी हा शब्द वापरुन त्यांनी प्रसार माध्यमात मराठवाड्यातील जनतेला आणि प्रसार माध्यमाला गुमराह करण्याच काम केलं असा आरोप आपल्या घणाघणाती टिकेद्वारे माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
मुक्तीसंग्राम दिन हा निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झालेला दिवस. त्यादिवशी संभाजीनगर येथे मुख्यमंत्री विकासाच्या कांही घोषणा करतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माजी लोक भावी सहकारी होतील हे बोलून त्यांनी विकासाला तर बगल दिलीच पण मराठवाड्यातील जनतेला दिशाभुल करण्याचे काम केले, असा आरोपही मुख्यमंत्र्यांच्या मुक्तीसंग्राम दिनाच्या विधानावर केला असून सध्याचे आघाडी सरकार हे वेगवेगळ्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम करत आहे आणि मुक्तीसंग्राम दिनीसुद्धा मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे अत्यंत चुकीच, विकासाला बगल देवून लोकांना दिशाभुल करण्याचे काम आहे, असेही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करतांना व्यक्त केले.
मुक्तीसंग्राम दिन हा मराठवाड्याच्या दृष्टीकोनातून खर्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस. कारण मुक्तीसंग्रामदिनी मराठवाडा हा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला पण लोकांना मुक्ती संग्रम दिनी मुख्यमंत्री कांही विकासाच्या घोषणा करतील अशी अपेक्षा होती पण तसे न करता जे मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले ते शुद्ध धुळफेक आणि दिशाभुल करण्याचा प्रयत्न करणारही होते असेही प्रसिद्धीपत्रकात माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले आहे.











