अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान –आ.संभाजीराव पाटील निलंगेकर..
शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी न्याय देणार...
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-अतिवृृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे गुलाबी वादळाची पुर्व सुचना देवून देखील त्यावर आवश्यक उपाय योजना राबविले नसल्याने पुर परिस्थिती निर्माण होवून खरीप पिकांचे नुकसान झाले,याला पुर्ण पणे प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असून प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, असे प्रतिपादन माजी पालकमंञी तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उजेड येथे शेती व घरांच्या नुकसानीची पाहणी प्रसंगी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.याप्रसंगी, त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले,शेषराव मम्माळे, धोंडीराम सांगवे,गणेश सलगरे,गणेश धुमाळे, शंकर बेंबळगे उपस्थित होते.

माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना धीर देताना भाजपा नेते सर्व ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत.हेक्टरी ७५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी बाबत शासन दरबारी पाठपुरावा करून दिवाळी पुर्वी मदत मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच हमीद पटेल, चेअरमन आबासाहेब पाटील उजेडकर,ऋषीकेश बद्दे, संजय बिराजदार,गणेश मोहिते,नागनाथ चलमले,भानुदास धुमाळ,राजु जाधव, अनंत जाधव, संतोष डोंगरे,सतीश भिक्का,नवनाथ डोंगरे,महेश लुल्ले,पंकज रक्साळे, विकास जागले,ओम सारोळे,अनिल शिंदे, रावसाहेब पाटील,धनराज चावरे, महादेव शिंदे,भगवान बिराजदार, सादात पटेल,दयानंद चिमणशेट्टे, माधव कात्रे,दिलीप ढोबळे,किशोर पाटील, बालाजी ढोबळे, मुरलीधर सुर्यवंशी यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

नदी काठच्या घरांचे स्थलांतर आवश्यक.
मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले, तर पुराचे पाणी नदीकाठच्या शंभराहून अधिक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले व सर्व कुटूंबियांना अनेक संकटाचा सामना करावा लागला,यापुढे त्यांना असा त्रास होता कामां नये म्हणून या बाधित घरांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न करणार असल्याचे हे आ. निलंगेकर यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले.
—————————————————————–











