भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. कराड यांचा वाढदिवस
विविध उपक्रमांनी साजरा ; अनेकांकडून शुभेच्छा
लातूर दि. ३० – आध्यात्मीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह, राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांचा जन्मदिवस सोमवार ३० मे २०२२ रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आ. कराड यांच्या जन्मदिनानिमित्ताने लातूर येथील ‘संवाद’ या नवीन जनसंपर्क कार्यालयात जिल्हाभरातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तर राज्यभरातील अनेकांनी दुरध्वनीच्या माध्यमातून जन्मदिनाच्या निमित्ताने दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, शेतकरी शेतमजूराच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्ष करणारे, गरजुंना वेळोवेळी मदतीचा हात देणारे, कार्यकर्त्यांना बळ देवून मान आणि सन्मान मिळवून देणारे, हजारो कुटूंबांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून दिलासा देणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचा सोमवार दि. ३० मे २०२२ रोजी जन्मदिवस कोरोनानंतर यावर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अनेक गावागावात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदेवतांची अभिषेक, महापूजा व आरती करून आ. रमेशअप्पा कराड यांना दिर्घआयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. त्यानुसार असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणापूर येथील ग्रामदेवता आदिशक्ती श्री.रेणूकादेवी मंदिरात सकाळी ९ वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड साहेब यांच्या शुभहस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर माजी सभापती अनिल भिसे यांच्या वतीने आ. कराड साहेबांचा पेढेतुला कार्यक्रम करण्यात आला. तसेच रेणापूर येथील सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.

लातूर येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालय आणि लातूर तालुक्यातील मुरूड व माटेफळ येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या तीन्ही ठिकाणच्या शिबीरात रक्तदात्यांनी उर्त्फूतपणे रक्तदान केले. लातूर तालुक्यातील मौजे नांदगाव येथे पवनपुत्र हनुमान मैदानी कुस्तीस्पर्धा ऋषीकेश कराड मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आली. या स्पर्धेत अनेक मल्लांनी भाग घेतला होता.
आ. रमेशअप्पा कराड साहेब यांना दिर्घ आयुष्य लाभो यासाठी रेणापूर तालुक्यातील मौजे दर्जीबोरगाव येथील चिन्मयानंद स्वामी देवस्थान येथे अभिषेक, मौजे शेरा येथील दावद मलिक बाबा दर्गाह येथे चादर चढवणे, मौजे वांगदरी येथील श्री. हनुमान मंदिरात अभिषेक, पानगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे पुजन, मौजे कोष्टगाव येथील श्री. निळकंठेश्वर मंदिरात अभिषेक, खरोळा येथील श्री दत्त मंदिर आणि गोविंदनगर येथील श्री बालाजी मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तर लातूर तालुक्यातील मौजे सोनवती येथील खंडोबा मंदिरात अभिषेक, मुरूड अकोला येथे दर्गाहला चादर चढवणे, मुरूड येथील मुरूडेश्वर मंदिरात महापूजा, मौजे सारसा येथील गणेशनाथ देवस्थानात महाआरती, मौजे चिंचोली ब. येथील बल्लाळनाथ मंदिरात महापूजा, मौजे निळकंठ येथील श्री निळकंठेश्वर मंदिरात महापूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच औसा तालुक्यातील मौजे भादा येथे हरीहर मंदिर येथे अभिषेक, मौजे टाका येथील भिमाशंकर मंदिरात अभिषेक व साखर वाटप, मौजे शिवली येथील हनुमान मंदिरात महापूजा व केळीचे वाटप, मौजे काळमाथा येथील महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला.

जन्मदिनानिमित्त संयोजन समितीच्या वतीने लातूर येथील अंबाजोगाई रोड वरील नवीन संवाद या संपर्क कार्यालयात अभिष्ठचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयाला जिल्हाभरातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मित्रपरिवारांनी दिवसभरात आ. रमेशअप्पा कराड यांचे अभिष्ठचिंतन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीया, आ. सुरजितसिंह ठाकुर, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर आ. गोपीचंद पडळकर, आ. प्रसाद लाड, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून तसेच लातूर जिल्हाभरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी आदीं अनेकांनी आ. रमेशअप्पा कराड यांना जन्मदिनानिमित्त दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

सोमवारी संवाद या नवीन संपर्क कार्यालयात आ. रमेशअप्पा कराड यांची जिल्हयाचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, औश्याचे आ. अभिमन्यू पवार, माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आमदार विनायकराव पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदिप पाटील खंडापूरकर, भारतराव बोंदरकर, जिप माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, शैलेश लाहोटी, अमोल पाटील, विजय क्षिरसागर, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रम शिंदे, रामचंद्र तिरुके, माजी जिप अध्यक्ष राहुल केंद्रे, बापुराव राठोड, रोहीदास वाघमारे, जयश्री पाटील, संतोष मुक्ता, त्र्यंबक गुट्टे, अशोक केंद्रे, भागवत सोट, हनुमंतबापू नागटिळक, धनश्री अर्जूने, मनोज पुदाले, धर्मपाल देवशेट्टे, मनिष बंडेवार, दिग्विजय काथवटे, विजय गिल्डा, देविदास काळे, डॉ. बाबासाहेब घुले,अनिल भिसे, अनंत चव्हाण, रोहिदास वाघमारे, तुकाराम गोरे, मुक्तेश्वर वागदरे, सुनिल उटगे, मनोज कराड, सुधीर धुत्तेकर महेंद्र गोडभरले, प्रशांत पाटील, वसंतराव डिघोळे, प्रदिप मोरे, व्यंकटेश कुलकर्णी, सुकेश भंडारे, पंडीत सुर्यवंशी, चंद्रभान जाधव, चंद्रसेन लोंढे, सतिश आंबेकर, अॅड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, अभिषेक अकनगिरे, विजय काळे, गोविंद नरहरे, शरद दरेकर, श्रीकृष्ण जाधव, राम जेवरे, बालाजी फड, रामेश्वर बद्दर, संगम कोटलवार, विनोद कांबळे, गजानन भातलवंडे, निळकंठ साहेब, रोहन जाधव, गंगासिंह कदम, माऊली भिसे, अॅड.ज्ञानेश्वर चेवले, तानाजी बिराजदार, विष्णुदास मोहिते, रवि सुडे, नवनाथ आल्टे, जोतीराम चिवडे, संध्या जैन, महेश पाटील, उषा रोडगे, सुरेखा पुरी, अनुसया फड, सुरेखा मुळे, सुनिता माडजे, लता भोसले, उषा शिंदे, शीला आचार्य, श्रीमंत नगारगोजे, संजय डोंगरे, श्रीकात सुर्यवंशी, नरसिंह गोणे, जगदिश कुलकर्णी, हणुमंतबापू नागटिळक, शिवाजी बैनगिरे, अरविंद नागरगोजे, हणमंत देवकते, बस्वराज रोडगे, बालाजी गवारे, शामसुंदर वाघमारे, अनंत कणसे, विश्वास कावळे, जया काबरा, शामल कारामुंगे, अरूण समुद्रे, अनंत कोरे, कुलदिप ठाकूर, वैभव सापसोड, भैरवनाथ पिसाळ, अॅड. धनराज शिंदे, समाधान कदम, सिद्धेश्वर मामडगे, अनंत कोरे, महेंद्र जाधवर, बालासाहेब गुट्टे, ललिता कांबळे, अमित रेड्डी, रणजित मिरकले, वसंत करमुडे, गोविंद कराड, पद्माकर चिंचोलकर, अच्युत भोसले, संतोष चव्हाण, प्रताप पाटील, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, राजकिरण साठे, सोमनाथ पावले, रघुनाथ केंद्रे, गुणवंत करंडे, बाबा भिसे, काशिनाथ ढगे, लक्ष्मण नागीमे, वाजीद पटेल, अनवर पटेल, नाथराव गिते, तुकाराम मद्दे, किरण मुंडे, शास्त्री चव्हाण, शिवासिंह सिसोदिया, मारोती गालफाडे, बंडु केंद्रे विशाल कणसे, रमाकांत फुलारी, फुलचंद अंधारे, हणमंत भालेराव, कुलभूषण संपते, गोपाळ पवार, धनंजय बिक्कड, सदाशिव राठोड, धनंजय पवार, प्रशांत डोंगरे, गोपाळ शेंडगे, हरीकृष्ण गुरले, विरेंद्र चव्हाण, सचिन इगे, रमेश चव्हाण, रशिद पठाण, वैजनाथ हराळे, चंद्रकांत वांगसकर, शेख इर्शाद, धनंजय जाधव, पांडुरंग शिंदे, गोपाळ पाटील यांच्यासह, भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी त्याचबरोबर व्यापारी, डॉक्टर्स, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह लातूर एमआयटीचे डॉ. एन.पी. जमादार, डॉ. बस्वराज नागोबा, डॉ. सरीता मंत्री, डॉ. सुरेश कांबळे, डॉ. पल्लवी जाधव, सरवनन सर डॉ. बबन आडगावकर, डॉ. अरूणकुमार राव, डॉ. जाजू, डॉ, मालू, डॉ. सचिन भावठाणकर, डॉ. बस्वराज वारद, डॉ. चंद्रकला पाटील, डॉ. प्रदिप केंद्रे, सचिन मुंडे, व इतर अधिकारी व कर्मचारी आदी अनेकांनी आ. रमेशअप्पा कराड यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.




