सत्ताधारी जातनिहाय जनगणना मुद्द्यापासून पळ काढत आहे
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत
लातूर लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ चाकूर मध्ये जाहीर सभा संपन्न
सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
लातूर (प्रतिनिधी ): दि. २ मे २०२४ लोकसभा निवडणुकीत देशात इंडीया (महाविकास) आघाडी जिंकल्यास आणि आम्ही सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करणार आहोत. ही जातनीहाय जनगणना या देशातील प्रत्येक नागरीकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी राहुलजी गांधी यांचा करण्याचा मुख्य उद्देश आहे. ही जातनिहाय जनगणना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अंगलट आली आहे. यामुळे त्यांनी राजस्थान, मंगळसूत्र असे विषय समोर करून जातनिहाय जनगणना मुद्द्यापासून पळ काढत आहे असे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. १ मे रोजी सायंकाळी चाकूर या ठिकाणी जाहीर प्रचार सभा पार पडली. या जाहीर सभेस सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यासह डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लातुर लोकसभा मतदार संघाने आजपर्यंत चांगले नेतृत्व संसदेत दिले आहे. ही परंपरा टीकवण्यासाठी या निवडणुकीत डॉ. शिवाजी काळगे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. लोकशाही म्हटल्यास लोकांनी लोकासाठी चालवलेले सरकार, पण विद्यमान सरकारला याचा विसर पडला आहे. या विरोधात भारत जोडो न्याय यात्रेतून आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सर्व घटकांना सद्याच्या दहशतवादी सरकार पासून भयमुक्त करण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकल्यास जातनिहाय जनगणना आम्ही सत्तेत आल्यास करणार असून ती जातनिहाय जनगणना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अंगलट आली आहे. या देशातील प्रत्येक नागरीकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, हा राहुलजी गांधी यांचा मुख्य उद्देश आहे. पण यांनी राजस्थान, मंगळसूत्र असे विषय समोर करून जातनिहाय जनगणना मुद्द्यापासून पळ काढत आहे असे सद्या दिसून येत आहे. आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा, सोयाबीन कवडीमोल घेऊन जादा भावाने परदेशातून आयात करणे असा उद्योग सद्या सुरू आहे. ज्या लातुर मधून सर्वाधिक डॉक्टर, इंजिनिअर घडविले जातात, ज्या लातुर मध्ये बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात त्या शैक्षणिक लातुर पॅटर्नला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत लातुर पॅटर्न भंगार पॅटर्न आहे, असे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणतात त्यांना या लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी आणि भंगार म्हणणाऱ्यांना भंगार करावे व डॉ शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी निवडून देत लातुर पॅटर्न काय आहे हे विरोधकांना दाखवावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केल.

भरघोस मतदान करून उज्वल भविष्यासाठी
डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे
सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख
यावेळी बोलताना सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, ही लोकसभेची निवडणूक असून आजवर बऱ्याच पंतप्रधानानी देश चालविला पण गेल्या १० वर्षात जे पंतप्रधान आहेत असे घमेंडी, केवळ अश्वासने देणारे पण पूर्ण न करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आपल्याला मिळाले ज्यांनी कल्याणकारी सरकार कधी चालविले नाही, फोडाफोडीचे राजकारण केले, दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये त्यांनी टाकले असे पंतप्रधान आणि सरकार आज देशात असून हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही याची काळजी आपण भरघोस मतदान करून आपल्या उज्वल भविष्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

शिवराज पाटील साहेब आमचे नेते आणि
चाकूरचे भूमिपुत्र त्यांची मान आणि शान उंचावणे आमचे कर्तव्य
माजी मंत्री आमदर अमित विलासराव देशमुख
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदर अमित विलासराव देशमुख म्हणाले की, कोई लौटा दे मुझे बिते हुये दिन नही चाहीये मुझे अच्छे दिन अशी सुरुवात करीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढ्याला आपण दिलेला प्रतिसादाचे कौतुक करावे तितके कमी आहे असे ते म्हणाले. आदरणीय शिवराज पाटील साहेब आमचे नेते आणि चाकूरचे भूमिपुत्र असून त्यांनी मान आणि शान उंचावणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असा जनसमुदाय आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत याचे आम्हाला समाधान आहे. डॉ शिवाजी काळगे यांना सामान्य माणसाने उचलून धरले असून त्यांना प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि हे पाहता लातुरचा मतदार त्यांना लोकसभेत पाठविल्याशिवाय शांत बसणार नाही. लोकसभा निवडणुकीची ही लढाई आपल्याला सर्वाना मिळून लढायची असून डॉ. शिवाजी काळगे यांचे ईव्हीएम मशीन वर क्रमांक २ वर नाव असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन करीत चाकूर मधील लक्ष्मी नगर मधील सभागृह, क्रीडा संकुलसाठी निधी आणि शादी खाण्यासाठी आवश्यक निधी दिला असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

दिशाभुल करणाऱ्या भाजप सरकारला
पायउतार करण्यासाठी पुढाकार घ्यावा
माजी मंत्री विनायकराव पाटील
माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांना या सरकारने अनेक अश्वासने देऊन गेली १० वर्ष केवळ थापा मारल्या आणि एकही आश्वासन पूर्ण केले नाही. या लोकसभा निवडणुकीत अनेक पक्ष, गट तट, महिला, नागरिक, युवक सर्वजण एकत्र येऊन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी कामाला लागले आहेत. आपण देखील आशा भूलथापा देऊन केवळ दिशाभुल करणाऱ्या भाजप सरकारला पाय उतार करण्यासाठी पुढाकार घ्यावा व यावेळी यांच्या आश्वासनाला या निवडणुकीत बळी पडू नये असे म्हणत आजवर झालेली चूक यावेळी होणार नाही आणि किमान ५० हजार मतांची लीड देऊ असा शब्द दिला.
देशातील भाजपचा सुपडा साफ होणार
यावेळी बोलताना वजाहत मिरझा म्हणाले की, आज देशातील भाजपचा सुपडा साफ होणार असून सर्वत्र या सरकार बद्दल तीव्र रोष आहे. आणि आता केवळ काँग्रेस पक्षच आपणास यापुढे दिसणार असून आपण ही आता या सरकारला त्यांची जागा दाखवावी आणि डॉ शिवाजी काळगे यांना विजयी करावे अशी विनंती केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मुद्द्यावर
मराठा, धनगर समजाला झुलवत ठेवले
यावेळी बोलताना यशपाल भिंगे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दृष्टी दोष झाला असून यासाठी मविआने लातुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून नेत्र रोग तद्द डॉ शिवाजी काळगे याना उमेदवारी दिली असून आज बरेच जण भाजप मध्ये जात आहेत आणि त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेस पक्षाचे मतदार कमी होण्याऐवजी उलट वाढत आहे हे आवर्जून सांगावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी माणसात माणूस ठेवला नाही आरक्षण मुद्द्यावर मराठा, धनगर समजला झुलवत ठेवले असून याना यांची जागा दाखविण्याची ही वेळ आहे. भाजप म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी असून आपण आज कोणाच्या बाजूने आहात हे पाहण्याची ही लोकसभा निवडणूक असून आपला ओरिजिनल डीएनए हा काँग्रेस पक्षाचा आहे हे दाखविण्याची ही वेळ असून आपण मोठ्या संख्येने आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन उपस्थित सर्वांना त्यांनी केले.
यावेळी बोलताना एन.आर.देशमुख म्हणाले की, आम्ही गेली २५ वर्ष आदरणीय नेते सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम केले. सर्व सामान्य माणूसाचा विचार सतत केला आणि यापुढे देखील हे काम आम्ही करीत राहू असा शब्द दिला.

यावेळी बोलताना माधवराव कोळे म्हणाले की, चाकूर तालुक्यात काम करत असताना तालुक्यातील जवळपास ८५ गावात फिरलो व सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला यापुढे देखील काँग्रेस पक्षाचे काम करताना तण मनाने काम करेन आणि हे करताना आपण सर्वांनी एकत्रित येऊन या निवडणुकीत आपले शैक्षणिक धोरण, कायमस्वरूपी पाणी,रोजगार निर्मिती, चाकूर सह लातुर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीची ही लोकसभा निवडणूक असून या निवडणुकीत गेल्या कार्यकाळात विद्यमान सरकार आणि आपल्या निवडून दिलेल्या खासदारांनी काय केले हे विचारावे लागेल. या सरकारने धनगर समाजाला वेगवेगळ्या प्रकारची अनेक अश्वासने प्रत्येक निवडणुकीत दिली व मतदारांना भावनिक करून मते घेतली आणि नंतर आपल्याकडे फिरकून पाहिले नाही हा अनुभव लक्षात घेता या निवडणुकीत आपण ठाम भूमिका घेऊन कुठल्याही भूलथापाना बळी पडू नये असे आवाहन केले.

यावेळी बोलताना डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, आज मी आपल्या समोर मविआ चा लातुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा असून आपण गेल्या १० वर्षात विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरलो असून महागाई कमी झाली नाही,सुशिक्षित बेरोजगार नौकरी साठी धडपड करीत आहे पण नौकरी नाही, महिला खेळाडूंना आपल्या वर झालेल्या अन्याया मुळे मेडल परत करण्याची वेळ आली यासाठी आज आपल्याला या सरकार विरोधात लढा उभारण्याची गरज आहे. गेल्या सव्वा महिन्यात प्रचार करताना असा एकही माणूस भेटला नाही की ज्याचे काम विद्यमान खासदाराने केले आणि यासाठी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपली ताकद मताच्या रुपात माझ्या पाठीशी उभे करावे आणि मविआ ला बहुमताने विजयी करावे अशी विनंती केली.

यावेळी बोलताना विलास पाटील चाकूरकर म्हणाले की, सद्या सुरू असलेली लोकसभा निवडणूक ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज सर्व घटक त्रस्त असून सर्वसामान्य माणूस महागाई ने वैतागला आहे.शेतकर्याच्या शेतमालाला भाव नाही, सुशिक्षित बेरोजगार युवकाना रोजगार नाही,सोयाबीनला भाव नाही,जेवढा खर्च पिकविण्यासाठी होतो तेवढा देखील निघत नाही,खते व बियांचे भाव वाढले आहेत त्यात जीएसटी ची मार या सरकारला घेणेदेणे नाही या सरकारचे दोनच अपत्य आहेत ते म्हणजे अडाणी आणि अंबानी यामुळे आपण विचार करावा आणि विज्ञान विरुद्ध अज्ञान यामध्ये आपण सर्वांनी विज्ञानाच्या मागे राहावे व आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे याना विजयी करावे अशी विनंती त्यांनी केली.

दरम्यान लातुर लोकसभा मतदार संघातील मविआचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड आशा मताधिकक्याने विजयी करण्याचा निर्धार या जाहीर सभेस उपस्थित असलेल्या सर्वांनी व्यक्त केला. यावेळी बालाजी रेड्डी, श्रीशैल उटगे, शिवाजी बेंद्रे, वजाहत मिर्जा, संजय शेटे, विक्रांत गोजमगुंडे, अण्णासाहेब पाटील, एन.आर.पाटील, ऍड.कोळगावे, मकबूल वलांडीकर, हरिभाऊ गायकवाड, ज्योती ताई पवार, नेहा मोरे, सौ.चांदसुरे ताई, यांच्यासह मविआ घटक पक्षाचे पदाधिकारी, चाकूर सह परिसरातील नागरिक, महिला भगिनी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
