23.4 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeशैक्षणिकआयआयबी चा संकल्प

आयआयबी चा संकल्प

डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचा आयआयबी चा “संकल्प”

गडचिरोली: “

नीट” च्या निकालात देशभरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आयआयबीला सामाजिक कार्यांसाठी सुद्धा देशभरात आदर्श संस्था म्हणून ओळखले जाते.
क्लासेस परिसरात स्वखर्चातून सीसीटीव्ही, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत, कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, इत्यादी सामाजिक कामांसाठी आयआयबीला ओळखले जाते.
गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्न आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, परभणी जिल्ह्यातील स्वप्नभूमी येथील विद्यार्थ्यांचा दत्तक विद्यार्थी उपक्रम आणि आता हेमलकसा येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयआयबी मोफत प्रशिक्षण आणि स्टडी मटेरियल देणार असून अदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचा संकल्प केला आहे. आदिवासींसाठी जीवन वाहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे डॉ. प्रकाश आमटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी गडचिरोली येथील भामरागड च्या घनदाट जंगलात हेमलकसा या छोट्याश्या गावात वीज, रस्ता, पाणी ही कसलीही सुविधा नसतांना हिंस्र पशूंच्या सानिध्यात स्वतःच संपूर्ण आयुष्य घालवत आदिवासींच्या जीवनाला अर्थपूर्ण बनवले आहे.
भारतातील सर्वोच्च पुस्कारांपैकी पद्मश्री तसेच रॅमन मॅगसेसे पूरस्काराने गौरविण्यात आलेले जगविख्यात डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचे सुपुत्र अनिकेत आमटे आणि स्नुषा समीक्षा आमटे यांनी आयआयबी कॅम्पस येथे भेट दिली.
अनिकेत आणि समीक्षा आमटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत समाजाप्रती संवेदनशीलता महत्वाची असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनात्यांच्या पुढील आयुष्यसाठी शुभेच्छा देत सामाजिक भान ठेवण्याचा सल्ला दिला.

,…….,…….,…….,…….,…….,…….,…….,…….,…….,…….,…….,……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]