आयआयबीच्या कामगिरीची वर्ल्ड रेकार्ड ऑफ इंडीया बुक मध्ये नोंद
नांदेड प्रतिनिधी:
12 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’ घेण्यात आली होती. यापरिक्षेचा निकाल 1 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून आयआयबी च्या 33 विद्यार्थ्यांनी बायोलॉजी मध्ये पैकी च्या पैकी गुण मिळवले आहेत. तर एकूण 720 गुणांपैकी 710 गुण मिळवत अनिरुद्ध ढाखरे या विद्यार्थ्यांने देशात 38 वा क्रमांक मिळवला आहे.
आयआयबीच्या नीट-२०२१ च्या या ऐतिहासिक निकालाची वर्ल्ड रेकार्ड ऑफ इंडीया बुक मध्ये नोंद झाली असून या वर्षीच्या नीट परिक्षेच्या निकालात आयआयबीने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत इतिहास रचत ऐतिहासिक कामगिरी केली असून नीट-२०२१ च्या निकालांत तब्बल ३३ विद्यार्थ्यांनी ने बायोलॉजी या विषयात ३६० पैकी ३६० गुण मिळवले आहेत त्याबरोबरच १४९ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ६०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत..
या ऐतिहासिक कामगिरीसाठी आयआयबीची बेस्ट ईन्सिटीट्यूट फॉर मेडीकल एंट्ररन्स् प्रिपेरेशन म्हणून वर्ल्ड रेकार्ड ऑफ इंडीया बुक मध्ये नोंद झाली असून ७ डिसेंबर २०२१ रोजी त्यांना या संदर्भातील अधिकृत प्रमाणपत्र वर्ल्ड रेकार्ड ऑफ इंडीया बुक चे महाराष्ट्राचे पंच श्री संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर स्पेशल अॅडज्युडिकेटर, महाराष्ट्र यांनी जाहीर करून प्रदान केले आहे ..
नांदेड व लातूरकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रीया यावेळी शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे व आयआयबीवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ..

असे निटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले असून आयआयबी ने देशपातळीवर शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
सीईटी 2015 च्या निकालातही आयआयबी च्या 31 विद्यार्थ्यांना 100/100 गुण मिळाले होते त्यानंतर पून्हा एकदा आयआयबी ने ऐतिहासिक निकाल दिला आहे.
यामुळे हा निकाल लातूर किंवा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रासह देशातील सर्वात मोठा ठरला असून आयआयबीने त्यांच्या सखोल व परिपूर्ण तयारीचा पॅटर्न हा रियल पॅटर्न असल्याचे निकांलावरुन सिद्ध केले आहे…

आत्तापर्यंत आयआयबी ने 15000 पेक्षा जास्त MBBS डॉक्टर्स घडवले आहेत.
आयआयबी च्या वतीने दरवर्षी 11 वी आणि 12 वी च्या 2000 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश अथवा 4.80 करोड ची शिष्यवृत्ती फिस च्या स्वरूपात दिली जाते.
सामाजिक दृष्टकोन ठेऊन सुरू झालेली आयआयबी आजही प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असते.होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, क्लासेसच्या परिसरात स्वखर्चाने सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस चौकी, कंन्ट्रोल रूम, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत, गडचिरोली येथील आदिवासींना मोफत शिक्षण… इत्यादी. सामाजिक कामे आयआयबी करत आहे.सामाजिक जाणिवेचे डॉक्टर्स घडवून खेडोपाड्यात वैद्यकीय सेवा मिळावी ही आयआयबी ची मिशन आहे.यावर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आयआयबी ने फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी तीनही विषय एकाच ठिकाणी सुरू केले आहेत.











