11 वी २०२२ साठी आयआयबी देणार तब्बल 1000 विद्यार्थ्यांना २.४० कोटी स्कॉलरशिप
नांदेड/लातूर (प्रतिनिधी) –देशपातळीवर एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेसाठी कौतुकास पात्र ठरलेल्या आयआयबीने नीट-2022 साठी पुन्हा एक प्रयत्न करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी आयआयबी फास्ट म्हणजे फ्री अॅडमिशन सलेक्शन टेस्टची घोषणा केली असून, येत्या 13-फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पध्दतीने स्क्रिनिंग परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. नीट द्वारे एमबीबीएस प्रवेशासाठी सध्या तयारी करीत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेता आयआयबीच्या वतीने आयोजित 11 वी 2022 च्या बॅचसाठी आयआयबी फास्ट नुसार 1000 विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे स्कॉलरशिप मिळणार असल्याची माहिती आयआयबीच्या वतीने देण्यात आली आहे. आयआयबी फास्ट हा उपक्रम नांदेड आणि लातूर या दोनही शाखांमध्ये एकाच वेळी राबविण्यात येणार असून, आयआयबीच्या वतीने फास्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांनी दिली. पहिल्या टप्प्यात आयआयबी पीसीबी अॅपच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे नोंदणीकृत विद्यार्थी हे दि. 13-फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत सीबीएसई च्या विद्यार्थ्यांसाठी परिक्षा तर 2 ते 5 या वेळेत स्टेट बोर्ड च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा होईल. दोन्ही परिक्षा या नीटच्या अभ्यासक्रमानुसार पीसीबी पॅटर्नप्रमाणे 720 गुणांची असेल निगेटिव गुणपद्धती नसेल. सविस्तर माहितीसाठी आयआयबीच्या www.iibedu.com या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा आयआयबीच्या कार्यालातही नोंदणी करता येते 7304730730 किवा 7304567567 वर संपर्क साधून विद्यार्थ्यांना आयआयबी फास्टसाठी नाव नोंदणी करता येर्ईल.
12 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’ घेण्यात आली होती. यापरिक्षेचा निकाल 1 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून आयआयबी च्या 33 विद्यार्थ्यांनी बायोलॉजी मध्ये पैकी च्या पैकी गुण मिळवले आहेत. तर एकूण 720 गुणांपैकी 710 गुण मिळवत अनिरुद्ध ढाखरे या विद्यार्थ्यांने देशात 38 वा क्रमांक मिळवला आहे. आयआयबीच्या नीट-2021 च्या या ऐतिहासिक निकालाची वर्ल्ड रेकार्ड ऑफ इंडीया बुक मध्ये नोंद झाली असून या वर्षीच्या नीट परिक्षेच्या निकालात आयआयबीने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत इतिहास रचत ऐतिहासिक कामगिरी केली असून नीट-2021 च्या निकालांत तब्बल 33 विद्यार्थ्यांनी ने बायोलॉजी या विषयात 360 पैकी 360 गुण मिळवले आहेत त्याबरोबरच 149 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 600 पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.. यामुळे हा निकाल लातूर किंवा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रासह देशातील सर्वात मोठा ठरला असून आयआयबीने त्यांच्या सखोल व परिपूर्ण तयारीचा पॅटर्न हा रियल पॅटर्न असल्याचे निकांलावरुन सिद्ध केले आहे.
आत्तापर्यंत आयआयबी ने 15000 पेक्षा जास्त MBBS डॉक्टर्स घडवले आहेत.आयआयबी च्या वतीने दरवर्षी 11 वी आणि 12 वी च्या 2000 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश अथवा 4.80 करोड ची शिष्यवृत्ती फिस 11 वी व 12 वीच्या च्या फिस च्या स्वरूपात दिली जाते
11 वी आयआयबी फास्ट पात्रता व परिक्षा वेळापत्रक
पात्रता – इयत्ता १० वी चे सर्व नोंदणीकृत विद्यार्थी.
परिक्षा मोड – ऑनलाईन (आयआयबी पीसीबीव्दारे)
परिक्षा पद्धती: 10 वी विज्ञान अभ्यासक्रमावर नीट पॅटर्ननुसार 720 गुणांची परिक्षा,
परिक्षा दिनांकः 13-फेब्रुवारी-2022
परिक्षेची वेळ : सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत (सीबीएसई), 2-5 वाजेपर्यंत (स्टेट बोर्ड)
ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी सुरु आहे.
.

11 वी आयआयबी फास्ट पात्रता व परिक्षा वेळापत्रक
पात्रता – इयत्ता १० वी चे सर्व नोंदणीकृत विद्यार्थी.
परिक्षा मोड – ऑनलाईन (आयआयबी पीसीबीव्दारे)
परिक्षा पद्धती: 10 वी विज्ञान अभ्यासक्रमावर नीट पॅटर्ननुसार 720 गुणांची परिक्षा,
परिक्षा दिनांकः 13-फेब्रुवारी-2022
परिक्षेची वेळ : सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत (सीबीएसई), 2-5 वाजेपर्यंत (स्टेट बोर्ड)
ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी सुरु आहे.