आयएमए लातूर व वुमेन्स विंग आणि बंकटलाल स्कुलच्या संयुक्त विद्यमाने —
–आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
लातूर : आयएमए लातूर व वुमेन्स विंग तसेच श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कुलच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ( दि. २१ जून ) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनाचा कार्यक्रम श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात पार पडला.

लातूर आयएमएच्या वतीने सातत्याने विविध आरोग्य विषयक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपूरे , कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे, आयएमए वूमेन्स विंगच्या सचिव डॉ. प्रियंका राठोड ,उपाध्यक्ष डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. राजेश दरडे, कार्यकारिणी सदस्य डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. सुबोध सोमाणी , डॉ. ओमप्रकाश भांगडिया, डॉ. श्याम सोमाणी , डॉ. वृंदा कुलकर्णी, डॉ. प्रशांत कापसे, डॉ. दत्तात्रय मंदाडे, डॉ. विनोद स्वामी, डॉ. अशोक मालू , डॉ. श्रीकांत बाहेती, डॉ. राम पाटील, डॉ. मधुसूदन बियाणी , वुमन्स विंगच्या डॉ. केतकी चवंडा, डॉ. शितल टिके, डॉ. सोनल मैंदरकर, डॉ. सत्यकला गरड, डॉ. वर्षा दरडे, डॉ. शोभाराणी करपे , डॉ. अर्चना कापसे, डॉ. अंजू बदने, डॉ. मनीषा बिरादार , डॉ. प्राची पन्हाळे, डॉ. स्नेहल शिवपुजे, डॉ. गीतांजली स्वामी, डॉ. विद्या कांदे, डॉ. राजश्री गुंडावार, डॉ. स्नेहल सांगळे, डॉ. वैशाली दाताळ, डॉ. मोनिका ढवळे पाटील सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थितांनी सामुहिक योगासन -प्राणायामाचे प्रात्यक्षिक केले. उत्तम आरोग्य व स्वास्थासाठी योगासन – प्राणायामाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. भारतीय ऋषी – मुनींनी योगाचे महत्व ग्रंथांच्या माध्यमातून विशद केले होते. सद्यस्थितीत योगगुरू स्वामी रामदेव यांनी योगाला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे मौलिक कार्य केले आहे. तसेच देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या योगसाधनेला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळाली आहे. म्हणूनच प्रतिवर्षी दि. २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.
योगासने आणि योगाभ्यासाचे फायदे सर्वसामान्य जनतेबरोबरच विद्यार्थ्यांनाही कळावे व त्याच्यात रुची निर्माण व्हावी यासाठी आहे आयएमए व बंकटलाल स्कुलच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योगासनांचे सादरीकरण डॉ. आरती झंवर, डॉ. शिल्पा गोजमगुंडे व डॉ. वर्षा पाटील यांनी केले. शाळेचे योगशिक्षक सच्चिदानंद देशपांडे यांनी योगाभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक – विद्यार्थ्यांनीही यात उत्साहाने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रशांत बुक्कावार, उपप्राचार्य वैभव पोतदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे समन्वयक विकास येवते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमएचे सर्व पदाधिकारी व शाळेचे सर्व क्रीडा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.