29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeआरोग्य वार्ताआरोग्य मेळावा

आरोग्य मेळावा

सशक्‍त भारतासाठी निरोगी आरोग्‍य महत्‍वाचे आ.संभाजी पाटील निलंगेकर

निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्‍यातील आरोग्‍य मेळाव्‍यांचे उदघाटन

निलंगा प्रतिनिधी:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वात सक्षम भारत घडत आहे. सक्षम भारतासाठीच सशक्‍त भारत व्‍हावा याकरीता निरोगी आरोग्‍य महत्‍वाचे आहे. ही बाब लक्षात घेवूनच केंद्र सरकारच्‍या वतीने तालुक्‍याच्‍या ठिकाणी आरोग्‍य मेळावा आयोजित करण्‍यात येत असुन या मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येकाची आरोग्‍य तपासणी होवून ज्‍यांना आवश्‍यकता आहे त्‍यांच्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे. याकरीता सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणा-यांनी योगदान दयावेत असे आवाहान आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

आझादी का अमृत महोत्‍सव अंतर्गत केंद्र सरकारच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या वतीने प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी आरोग्‍य मेळावे आयोजित करण्‍यात आलेले आहेत. त्‍याअनुषंगाने निलंगा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी येथे आयोजित आरोग्‍य शिबीराचे उदघाटन आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी आ.निलंगेकर बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारने समाजातील प्रत्‍येक घटकासाठी विविध योजना सुरू केलेल्‍या असुन प्रत्‍येक नागरिकांचे आरोग्‍य सदृढ राहावे याकरीता विविध उपक्रमही राबविले असल्‍याचे सांगून आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी निरोगी आरोग्‍यासाठी एक एक पाऊल पुढे टाकणे सुरू झालेले आहे. निरोगी आरोग्‍य असेल तरच सशक्‍त भारत घडणार आहे. त्‍यामुळेच प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी आरोग्‍य मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याचे सांगितले. कोरोना काळात सर्वांनीच आरोग्‍याकडे योग्‍यपणे लक्ष दिलेले होते. मात्र आता कोरोना ओसरत चालेला असुन पुन्‍हा आरोग्‍याकडे दुर्लक्ष होण्‍याचे प्रमाण वाढू लागलेले आहे. त्‍यामुळेच या आरोग्‍य मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येकांची तपासणी होणे आवश्‍यक असल्‍याचे आ.निलंगेकर यांनी स्‍पष्‍ट केले.

केंद्र सरकारने याकरीता पुढाकार घेतलेला असुन प्रशासनही आपली जबाबादारी पार पाडत असल्‍याचे सांगून आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणा-यांनी आपली जबाबदारी ओळखून सतत आरोग्‍य मेळावे यशस्‍वी करण्‍यासाठी योगदान देणे गरजेचे असल्‍याचे आ.निलंगेकर यांनी यावेळेस स्‍पष्‍ट केले. प्रत्‍येक लोकप्रतिनिधीनी आपआपल्‍या कार्यक्षेत्रात प्रवास करून ज्‍यांना आरोग्‍याच्‍या समस्‍या आहेत. त्‍यांची यादी तयार करून त्‍या लोकांची तपासणी करून घेण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा असे आवाहन केले. ज्‍यांची आरोग्‍य तपासणी झाल्‍यानंतर ज्‍यांना शस्‍त्रक्रियाची गरज आहे. त्‍यांच्‍या शस्‍त्रक्रिया स्‍थानिक रूग्‍णालयात नाही झाल्‍या तर त्‍या शस्‍त्रक्रिया लातूर पुणे किंवा मुंबई सारख्‍या ठिकाणी करून घेण्‍याची जबाबदारी आपली असल्‍याची ग्‍वाही आ.निलंगेकर यांनी यावेळी दिली. मात्र याकरीता राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांनी आपले योगदान देवून आपआपल्‍या परिसरातील नागरिक निरोगी करण्‍यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्‍याचे सांगितले.

या आरोग्‍य मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी निलंगा उपविभागीय अधिकारी शोभाताई जाधव, तहसिलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्‍य अधिक्षक दिलीप सोंदळे, जिल्‍हा संघटन सरचिटणीस तथा माजी सभापती संजय दोरवे, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी उपाध्‍यक्षा भारतबाई साळुंके, माजी नगराध्‍यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शहराध्‍यक्ष अॅड.विरभद्र स्‍वामी, शिरूर अनंतपाळ तहसीलदार अतुल जटाळे, तालुका आरोग्य अधिकारी नारायण देशमुख, तालुकाध्‍यक्ष मंगेश पाटील, अॅड.संभाजीराव पाटील, नगराध्‍यक्ष मायावती धुमाळे, गटविकास अधिकारी बळीराज चव्‍हाण, देवणी तहसिलदार सुरेश घोळवे, वैदयकीय अध्‍यक्ष निळकंठ सगर, तालुकाध्‍यक्ष काशिनाथ गरीबे, जि.प.सदस्‍य प्रशांत पाटील, पृथ्‍वीराज शिवशिवे, माजी सभापती शंकर पाटील तळेगांवकर, गटविकास अधिकारी महेश सुळे आदीसह वैदयकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]