25.2 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडीआर्ट ऑफ लिव्हिंगचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

आर्ट ऑफ लिव्हिंगचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

*एसबीआयएफ आरण्य : मिशन ग्रीन अर्थ वृक्ष लागवड प्रकल्प*

*आखरवाई येथे ५१ हजार वृक्ष लागवड**

*जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ*

*लातूर;दि.२१( माध्यम वृत्तसेवा ) :–आर्ट ऑफ लिव्हिंग लातूर ,वनविभाग धाराशिव, एसबीआय अरण्य: मिशन ग्रीन अर्थ वृक्ष लागवड प्रकल्प मराठवाडा अंतर्गत आखरवाई येथे ५१ हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ आज करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.*

एसबीआय फाउंडेशन, महाराष्ट्र शासन ,वन विभाग धाराशिव आणि व्यक्ती विकास केंद्र इंडिया, आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्र बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आखरवाई येथे ‘एसबीआयएफ आरण्य: मिशन ग्रीन अर्थ वृक्ष लागवड प्रकल्प ‘मराठवाडा अंतर्गत ५१ हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे मॅडम यांच्या ग्रीन लातूर हरित लातूर या संकल्पनेला धरून आखरवाई येथे ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल आणि जैव विविधता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी फूड फॉरेस्ट ही संकल्पना राबवण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी नक्षत्र वन पण तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पातर्गत सर्व जीवांना अन्न मिळेल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे. पशुपक्षी, प्राणी, फुलपाखरे अगदी मुंगी पासून सर्वांना या ठिकाणी आनंदाने राहता येईल अशी वृक्ष रचना करण्यात येत आहे. या ठिकाणी विविध औषधी वनस्पती, दीर्घकाळ जगणारी वृक्ष ,वटवृक्ष, देशी विविध जातीची फळझाडे, लुप्त होत चाललेल्या आंब्याच्या गावरान जाती ,चिंच ,आवळा, बिबा, बेल, कवट ,ताम्हण यासारखे दुर्मिळ होत चाललेली वृक्ष या सर्वांची लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे, अशी माहिती व्यक्ती विकास केंद्र इंडिया सामाजिक प्रकल्पाचे संचालक महादेव गोमारे यांनी दिली.

आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते जगद्गुरु श्री श्री श्री रविशंकर गुरुजी आणि धाराशिव वनविभागाचे विभागीय वनाधिकारी बाल किशोरजी पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे ,आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव गोमारे, संतोष गिरवलकर , कैलास जगताप, शिवा स्वामी, संजय गायकवाड, संजय घुगे, व्यंकटेश कौरवाड, जेष्ठ पत्रकार गोपाळ कुळकर्णी तसेच अंकुर बाल विकास केंद्रचे अध्यक्ष श्री व्यंकटराव दापेगावकर, ॲड योगेश शिरसाठ,सहशिक्षक श्री शिंदे सर व शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला.

आखरवाई हे गाव लातूर विमानतळा शेजारी असून लातूर पुणे महामार्गावर आहे. जवळच प्रसिद्ध असा नामांकित मांजरा साखर कारखाना आहे. याच ठिकाणी सुंदर असे नैसर्गिक पर्यावरण पूरक पर्यटन स्थळ व्यक्तिविकास केंद्र आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून साकार होत आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे- मॅडम यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या; तसेच जास्तीत जास्त लोकांनी वृक्षारोपण करून ‘ग्रीन लातूर हरित लातूर’ या संकल्पनेला सहकार्य करावे असे आवाहन देखील केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]