लातूरच्या रिंग रोडसह चार मोठे प्रकल्प मार्गी!
अभिमन्यू पवारांचा विकासाभिमुख ठरलेला नागपूर दौरा – गडकरींकडून लातूरला मोठी विकास भेट!
- लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी अभिमन्यू पवारांचा पुढाकार — रिंग रोड, फ्लायओव्हर, भुयारी मार्गास गती! अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नांना फळ –
*लातूर रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा! लातूरच्या विकासासाठी अभिमन्यू पवारांचा दमदार पाठपुरावा
*गडकरींकडून चार महत्त्वाच्या प्रकल्पांना ग्रीन सिग्नल! अभिमन्यू पवारांचा विकास मिशन यशस्वी
- * गडकरींकडून लातूरकरांना दिवाळीची मोठी भेट!.
..लातूर – लातूर शहराच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलवणारा ऐतिहासिक निर्णय (२३) रोजी नागपूरमध्ये घेण्यात आला आहे. देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर शहराबाहेरून जाणाऱ्या ६० किमी लांबीच्या पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांनी आज नागपूर येथे गडकरी यांची भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकासकामांचा सविस्तर पाठपुरावा केला.पेठ – चांडेश्वर – कव्हा – बाभळगाव – भातखेडा – खुलगापूर – नांदगाव – रायवाडी – हरंगुळ – खंडापूर – गंगापूर – पेठ या मार्गाने जाणारा ६० किमी लांबीचा पर्यायी रिंग रोड लातूर शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. या मार्गाला यापूर्वी राज्य मार्गाचा दर्जा देऊन ४८ किमी लांबीचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १२ किमी भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश नितिन गडकरींनी बैठकीतूनच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना फोनवरून दिले. राज्य शासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर या रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याची मंजुरी तात्काळ देण्यात येईल, असा शब्द गडकरींनी लातूरकरांना दिला.

या निर्णयामुळे लातूर शहराच्या विकासाला मोठी गती मिळणार असून वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी निपटारा होणार आहे.यासोबतच आमदार अभिमन्यू पवार यांनी आशिव पाटी येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भुयारी मार्ग (Vehicle Underpass) उभारण्याची मागणी केली. आशिव – मातोळा – किल्लारी – जेवरी – नणंद या निळकंठेश्वर मार्गावर वाढत्या वाहतुकीचा आणि आशिव ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून मा. गडकरींनी या कामास मंजुरी देण्याच्या लेखी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दिल्या आहेत.तेरणा नदीवरील उजनी पुलावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूककोंडी निर्माण होते तसेच नालीअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर पुलाची पुनर्बांधणी व मोठी नाली बांधकामाचे काम यापूर्वीच मंजूर झाले असून या कामाला प्रत्यक्षात पुढील १५ दिवसांत सुरुवात करण्याचे आदेश गडकरींनी दूरध्वनीवरून संबंधित विभागाला दिले आहेत.

लातूर-औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील औसा शहरात होत असलेल्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामातही गती आली आहे. या उड्डाणपुलाचा डीपीआर तयार करण्यासाठी कन्सल्टंट कंपनी नेमण्यासाठी निविदा काढण्यात आली असून ३० ऑक्टोबर २०२५ ही अंतिम तारीख आहे. डीपीआर, अंदाजपत्रक, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पूर्ण करून ९ महिन्यांत उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आश्वासन गडकरींनी दिले आहे. त्यामुळे औसेकरांना अपेक्षित असलेला उड्डाणपूल आता साकाराच्या दिशेने वाटचाल करत आहे..

.आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, “औसा मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी आजची भेट अतिशय फलदायी ठरली आहे. सर्व प्रकल्प प्रत्यक्षात पूर्णत्वास जाईपर्यंत माझा पाठपुरावा कायम राहील.”या भेटीमुळे लातूर शहर आणि परिसरातील वाहतूक, पायाभूत सुविधा आणि विकासकामांना नवी ऊर्जा मिळाली असून जिल्हा आता अधिक सक्षम आणि प्रगत लातूरच्या दिशेने पुढे जात आहे.




