औसा – शेत तिथे रस्ता या अभियानातून आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघात एक हजार किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे शेतरस्ते कामाचे जाळे निर्माण करून राज्यात शेतरस्त्यांचा आदर्श औसा पॅटर्न निर्माण केला.या कामासाठी सातत्याने पाठपुरावा आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून होत असताना आता मतदारसंघात १८ कोटी रुपयांच्या मातीकामासहित खडीकरण व मजबुतीकरण कामांना मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग असलेल्या शेतरस्ते कामांसाठी आपला संपुर्ण आमदार निधी देऊन शेत तिथे रस्ता या संकल्पनेतून मतदारसंघात शेतरस्ते कामांना प्राधान्य देऊन आ. अभिमन्यू पवार यांनी एक आदर्श औसा पॅटर्नची ओळख निर्माण केली आहे.या कामासंदर्भात जागरूक असलेल्या आ. अभिमन्यू पवार यांनी अल्पावधीतच हि संकल्पना हाती घेऊन ती यशस्वीपणे पार पडत असताना प्रामुख्याने मतदारसंघातील शेतकर्यांच्या विकासाला चालना दिली आहे.त्याचा सकारात्मक बदल म्हणजे मतदारसंघातील अनेक गावातील शेतकऱ्यांना या शेतरस्ते अभियानाचा मोठा फायदा झाला आहे.त्यांच्या याच प्रयत्नामुळे औसा विधानसभा मतदारसंघातील ७३ किलोमीटर लांबीच्या ३८ शेतरस्त्यांच्या सुमारे १८ कोटी रुपयांच्या मातीकामासहित खडीकरण व मजबुतीकरण कामांना मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंयामतर्गत मंजुरी प्राप्त झाली आहे.याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांचे आभार मानले आहेत.

_______________________________
२ महिन्यात ७३ कोटींच्या विकास कामांना मंजुरी
अवघ्या २ महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने औसा मतदारसंघातील सुमारे ७३ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे.खरीप हंगामातील पीकांची काढणी पूर्ण झाल्यानंतर ही मंजूर कामे सुरू करणं अपेक्षित असून यामुळे हजारो शेतकर्यांना शेतरस्त्यांवाचूनची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
.