आ. कराड यांच्या हस्ते सत्कार

0
218

*मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त*

*आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार*

लातूर,- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर हे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूर सीआरपीएफचे संजीव कुमार, लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, रवींद्र येळणूरकर, डॉ कविता रायजादा, आकाश गडगळे, रामभाऊ पवार ज्योतीताई मार्कंडे पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी संघर्ष करून बलिदान देऊन मराठवाड्याला मुक्ती मिळवून दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुळेच हा मराठवाडा मुक्त झाला मराठवाडा ही संतांची भूमी आहे या मराठवाड्याने राज्याला आणि देशाला नेतृत्व दिले मात्र सातत्याने या मराठवाड्यावर अन्याय होत असल्याची खंत आ रमेशआप्पा कराड यांनी यावेळी बोलून दाखविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here