*आ.निलंगेकरांच्या पत्राची दखल*

0
312

राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पत्राची दखल
लातूर/प्रतिनिधी ः- वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षा क्रमप्राप्त असून याचा निकाल लागून दीड महिना लोटला आहे. मात्र राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नसून देशातील इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरु करून विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत करावी अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे दि. 24 डिसेंबर रोजी पत्राद्वारे केली होती. माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या पत्राची तात्काळ दखल घेत वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी क्रमप्राप्त असलेल्या नीट परीक्षेचा निकाल दीड महिन्यापुर्वी लागेलेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाल्यांने राज्यशासनाने वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु केलेली नव्हती. या याचिकेवर दि. 6 जानेवारी 2022 रोजी सुनावणी होणार आहे. याचिका दाखल झालेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासह गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करण्यास स्थगिती दिलेली नाही. ही बाब माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देत विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केलेली होती. या पत्रात आ. निलंगेकरांनी देशातील गुजरात, कर्नाटक, केरळ यासह इतर राज्यांनी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असल्याचे लक्षात आणून दिले होते. ही प्रक्रिया सुरु केल्यास विद्यार्थ्यांच्या एक ते दीड महिना वेळेची बचत होणार असल्याने ही प्रक्रिया तात्काळ सुरु करावी अशी मागणी आ. निलंगेकर यांनी केली होती.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दि. 24 डिसेंबर रोजी दिलेल्या पत्राची तात्काळ दखल राज्य शासनाकडून घेण्यात आलेली आहे. वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून यासंदर्भात राज्य सामाईक प्रवेश सेलने नोटिफिकेशन काढलेले आहे. त्यानुसार दि. 30 डिसेंबर ते 5 जानेवारी यादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी आणि नोंदणी शुल्क भरता येणार आहे. दि. 3 डिसेंबर ते 6 जानेवारी यादरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक असणारी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत तर दि. 8 जानेवारी रोजी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केलेल्या मागणीमुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी माजी मंत्री आ. निलंगेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here