28 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeसांस्कृतिक*आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते संवाद कार्यालयात श्रीगणेशाची स्थापना*

*आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते संवाद कार्यालयात श्रीगणेशाची स्थापना*

                 लातूर दि.३१– सुखकर्ता दुखहर्ता विघ्नहर्ता आद्य देवता श्री गणेशाची भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते बुधवार रोजी गणेश चतुर्थी दिनी मोठ्या उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणात भाजपाच्या संवाद कार्यालयात प्रतिष्ठापना करण्यात आली.

              हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला खूप मोठा मान सन्मान आहे कोणतेही शुभ कार्य असल्यास सर्वप्रथम श्री गणेशाला पूजेचा मान असतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाज प्रबोधन आणि जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. तेव्हापासून महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो.

          लातूर येथील अंबाजोगाई रोडवर असलेल्या भाजपाच्या संवाद कार्यालयात बुधवारी दुपारी साडेबारा वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते विधिवत श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. मंगलमय वातावरणात पूजा, आरती करून मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात आला. 

मोठ्या थाटात झालेल्या श्री गणेशाच्या स्थापना कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेशाचे अमोल पाटील, उद्योजक जगदीश कुलकर्णी, महेंद्र जाधवर, प्रा रघुनाथ केंद्रे, भाजपा ओबीसी मोर्चाचे मराठवाडा संपर्कप्रमुख डॉ बाबासाहेब घुले जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, वसंत करमुडे, ललिता कांबळे, भाजपाचे लातूर तालुका अध्यक्ष बन्सी बन्सी, रेणापुर तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, सरपंच संघटनेचे रेणापूर तालुका अध्यक्ष शरद दरेकर, सुरज शिदे, लातूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अँड धनराज शिंदे, श्रीकृष्ण मोटेगावकर, अशोक सावंत, प्रताप पाटील, श्रीमंत नागरगोजे, प्रकाश जाधव, उज्वल कांबळे, पांडुरंग गडदे लक्ष्मण खलंग्रे चंद्रकांत कातळे यांच्यासह अनेक जण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]