*स्वंयभू निळकंठेश्वर देवस्थान परिसराचा*
*सर्वांगीन विकास करण्यासाठी कठिबध्द*
*भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांची ग्वाही*
असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लातूर तालुक्यातील मौजे निळकंठ येथील जागृत संयभू निळकंठेश्वर देवस्थान तिर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ठ करून या मंदिर परिसराच्या सर्वांगीन विकासाचा तयार करण्यात आलेल्या विकास आरखडयानुसार विविध योजनेच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशिल राहीन अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.
चौथ्या श्रावण सोमवार निमीत्ताने आ. रमेशअप्पा कराड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनीताई कराड यांनी महापूजा केली. देवस्थान विश्वस्थासह अनेक गावच्या ग्रामस्थांनी यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, मनातील भावना, वेदना व्यक्त करण्याचे मंदिर हे ठिकाण आहे. त्याठिकाणी नतमस्तक झाल्यावर मनाला शांती मिळते असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, राज्यात सर्व कांही सुरू आहे मात्र राज्यातील ठाकरे सरकारने अजूनही सर्व देवस्थाने बंद ठेवली आहेत यावेळी शिवदत्त औताडे यांनी भविष्यात करावयाच्या मंदिर परिसर विकास कामाची माहिती दिली. याप्रसंगी आ. कराड यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.

पहाटेपासूनच पावसाची रिमझिम सुरू असतानाही आ. कराड हे लातूरहून निळकंठ गावाकडे जात असताना तांदूळवाडी, काटगाव, कासारजवळा, जवळा बु. गाधवड, तांदूळजा, पिंपळगाव, भोसा येथील ग्रामस्थांनी रस्त्यात उभे करून वाजत गाजत मोठया उत्सुर्फपणे जागोजागी फटाके उडवून, हार पुष्प गुच्छ देवून जोरदार स्वागत केले.

यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, भाजपाचे भागवत सोट, दिलीप धोत्रे, जिप सदस्या मनिषा वाघमारे, कृउबा संचालक विष्णूअप्पा मोहिते, धनराज शिंदे, काशिनाथ ढगे, अनंत कणसे, शाम वाघमारे, पस सदस्य भैरवनाथ पिसाळ, विनायक मगर, गोपाळ पाटील, समाधान कदम, शुभम खोसे, शंकर चव्हाण, बापुराव बिडवे, प्रशांत शिंदे, अशोक सावंत, नामदेव मांडे, गोपाळ पवार, चंद्रकांत वांगस्कर, संभाजी लोखंडे, अच्युत पिसाळ, हनुमंत वाघमारे, वैजनाथ लवटे, अमर शिंदे, रशिद पठाण, बापू देवकर, लालासाहेब बिडवे, तानाजी ढोबळे, बाबासाहेब भिसे, मेघराज पिसाळ, अशोक बिडवे, सुभाष माने, सत्यवान देशमुख, नामदेव बिडवे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, अनेक गावचे कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.












