भादा लखनगाव बऱ्हाणपूर येथे विकास कामाचे
आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते भूमिपूजन
लातूर दि. २९- आमदार स्थानिक विकास निधी योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या लातूर ग्रामीण मतदार संघातील भादा, लखनगाव आणि बऱ्हाणपूर येथील सभामंडप, रस्ता कामे यासह विविध विकासकामाचे भूमिपूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
आमदार स्थानिक विकास निधी योजने अंतर्गत कामांच्या भुमिपूजन निमित्ताने भादा, लखनगाव आणि बऱ्हाणपूर या तिन्ही गावात गामस्थांनी मोठया उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले. यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांनी त्या त्या गावातील ग्रामस्थांसोबत संवाद साधून शेतरस्ते, गावअंतर्गत रस्ते नाल्या, विज पुरवठा, पाणीपुरवठा यासह विविध अडी अडचणी जाणून घेतल्या. कांही ठिकाणी त्या गावातूनच संबंधीत अधिकाऱ्यांशी दुरध्वनी द्वारे संपर्क साधून गावकऱ्यांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याच्या सुचना केल्या. त्याचबरोबर गावचे प्रश्न येत्या काळात प्राधान्याने सोडविण्याबाबत ग्रामस्थांना आ. कराड यांनी दिलासा दिला.
याप्रसंगी आ. रमेशअप्पा कराड यांच्या समवेत भाजपा ओबीसी आघाडीचे विभागीय संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भिसे, जिल्हा चिटणीस सोमनाथ पावले, युवा मोर्चाचे राजकिरण साठे, गुणवंत कारंडे, महादेव मुळे, देवराव मोहिते, भारत लोकरे, बालाजी शिंदे, रवींद्र पाटील, लिबराज सोमवंशी, अक्षय भोसले यांच्यासह अनेकजण दौऱ्यात होते.
भादा येथील आनंद नगर परिसरात सुमारे 10 लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजन आ. रमेशआप्पा कराड आणि मंदिराचे पुजारी श्रीधर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भादा येथील रेवणसिद्ध महाराज पाटील, सरपंच मीनाताई दरेकर, सतीश कात्रे, सुरेश लटुरे, सूर्यकांत पाटील योगेश लटुरे तानाजी गायकवाड राधाताई माळी दिपाली उबाळे सुनिता देडे सत्यशीला बनसोडे सूर्यकांत उबाळे अमोल पाटील तय्यब पठाण रुक्सेन डोलारे संतोष स्वामी महादेव रत्ने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सभा मंडप मंजूर केल्याबद्दल अनेक महिलांनी आ. रमेशआप्पा कराड यांचे आभार मानले तर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला
लखनगाव येथे 5 लाखाच्या गावांतर्गत रस्ता कामाचे आणि 2 लाखाच्या हायमास्ट पथदिवे या कामाचे आ. रमेशआप्पा कराड आणि ज्येष्ठ नागरिक प्रभाकर कदम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी लखनगाव येथील उपसरपंच प्रदीप कदम पवन अंधारे राजेंद्र खरात व्यंकट कांबळे ज्ञानोबा गोडभरले बळीराम बडगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
बऱ्हाणपूर येथे मंजूर करण्यात आलेल्या 5 लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडप आणि 3 लाखाच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आ. रमेशआप्पा कराड आणि सदाशिव जोगी महाराज यांच्या हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी बऱ्हाणपूर येथील कुंडलीक ताकभाते रवींद्र पाटील राम पटणे राहुल पाटील अनिल मोरे गुरुलींग ढगे देवराव पाटील ओम शंकर हजारे यांच्यासह अनेक जण होते