25.6 C
Pune
Thursday, March 26, 2026
Homeराजकीय*आ.श्रीकांत भारतीय आ.कराड यांची सदिच्छा भेट*

*आ.श्रीकांत भारतीय आ.कराड यांची सदिच्छा भेट*

भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री आ. श्रीकांत भारतीय यांची आ. रमेशआप्पा कराड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

      लातूर दि.१२ – भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटनमंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य आ. श्रीकांत भारतीय यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या ‘प्रयाग’ निवासस्थानी शनिवारी सकाळी सदिच्छा भेट दिली.

          या भेटीदरम्यान आ. भारतीय आणि आ. कराड यांच्यात पक्ष संघटनात्मक कामाबरोबरच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आ. श्रीकांत भारतीय यांचा आ. रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी भाजपाचे मराठवाडा मीडिया प्रमुख रामभाऊ कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेशाचे अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, भागवत सोट, वसंत करमुडे यांच्यासह अनेक जण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]