26.9 C
Pune
Tuesday, April 29, 2025
Homeउद्योग*इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ चे आयोजन*

*इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ चे आयोजन*

~ शेफ संजीव कपूर आणि शेफ रणवीर ब्रार सन्मानित ~

मुंबई, १५ जुलै २०२२: गोदरेज विक्रोळी कुकिना हा गोदरेज इंडस्ट्रीजचा खाद्यपदार्थ व पाककला क्षेत्राला समर्पित प्लॅटफॉर्म आणि फूड ब्लॉगर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ (आयएफबीए) सोहळ्याचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथील नाइन डाइन येथे केले. इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ सोहळ्यात शेफ संजीव कपूर आणि शेफ रणवीर ब्रार यांना पीपल्स चॉइस- क्युलिनरी आयकन्स ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खाद्यपदार्थ व पाककला क्षेत्राला दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल दोन्ही तज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.

योर फूड क्लबचे संस्थापक व काँटेण्ट क्रिएटर शेफ संज्योत कीर यांना सोशल मीडिया स्टार ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्ली टेल्सच्या संस्थापक कामिया जानी यांनी इन्स्टाग्राम स्टार ऑफ द इयर आणि ट्रॅव्हल यूट्युबर ऑफ द इयर असे दोन पुरस्कार प्राप्त केले. याशिवाय आयएफबीए २०२२मध्ये आणखी ५८ विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या यादीमध्ये भारतभरातील शेफ्स, रेस्टोरंट्स, काँटेण्ट क्रिएटर्स, ब्लॉगर्स, माध्यम संस्था, समुदाय व टीव्ही व्यक्तिमत्वांचा समावेश आहे. खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात या वर्षामध्ये प्रशंसनीय काम करणाऱ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. या सर्वांना ७ प्रमुख पुरस्कार विभागांद्वारे मान्यता देण्यात आली- फेसबुक, इन्स्टाग्राम, ब्लॉग, यूट्यूब, मीडिया, हॉस्पिटॅलिटी आणि प्रख्यात शेफ्स. याशिवाय या पुरस्कारांचे वर्गीकरण २९ उपविभागांमध्ये करण्यात आले.

Marathi Photo Caption:
गोदरेज विक्रोळी कुकिना आणि फूड ब्लॉगर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ (आयएफबीए) सोहळ्याचे आयोजन मुंबईत केले. या सोहळ्यात शेफ संजीव कपूर आणि शेफ रणवीर ब्रार यांना पीपल्स चॉइस- क्युलिनरी आयकन्स ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खाद्यपदार्थ व पाककला क्षेत्राला दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल दोन्ही तज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला. तसेच खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात या वर्षामध्ये प्रशंसनीय काम करणाऱ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

गोदरेज इंडस्ट्र्जी लिमिटेड आणि सहयोगी कंपन्यांच्या कॉर्पोरेट ब्रॅण्ड अँड कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख तसेच उपाध्यक्ष सुजीत पाटील या उपक्रमाबद्दल म्हणाले, “विक्रोळी क्युकिना हा गोदरेजचा अशा प्रकारचा एकमेव ब्रॅण्ड अॅग्नोस्टिक प्लॅटफॉर्म आहे. यावर अन्नपदार्थांच्या क्षेत्रातील ब्रॅण्ड्स, शेफ्स, फूड ब्लॉगर्स, इन्फ्लुएन्सर्स व सर्व खवय्ये संवाद साधतात व कल्पनांचे आदानप्रदान करतात. इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२साठी, फूड ब्लॉगर्स असोसिएशन ऑफ इंडियाशी सहयोगाची संधी मिळाली, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. फूड या क्षेत्रात झालेल्या सर्वोत्तम कामाची हा प्लॅटफॉर्म दखल घेतो. उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम प्रतिभेची अशी दखल घेतली गेल्यास आणखी चांगले काम होऊ शकेल आणि या महान उद्योगक्षेत्राचा दर्जा आणखी वाढेल असे आम्हाला वाटते. विजेत्यांचा फूड अँड बेव्हरेज परिसंस्थेतील पुढील प्रवास उत्तम व्हावा अशी शुभेच्छा आम्ही देतो.”

एफबीएआयचे सहसंस्थापक समीर मलकानी पुरस्कारांबद्दल म्हणाले, “नवीन प्रतिभा शोधून काढणे व उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे कायमच #आयएफबीएच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक राहिले आहे. भारतभरातून येणाऱ्या प्रवेशिकांच्या संख्येत झालेली वाढ ही अशा मान्यतांमध्ये असलेला रस व आवश्यकता दाखवते. मी सर्व सहभागींचा, संबंधितांचा व परीक्षकांचा आभारी आहे. त्यांनी आमच्या या उपक्रमाला खूप चांगले पाठबळ दिले आणि आमचे को-होस्ट गोदरेज इंडस्ट्रीजचा तर विशेष उल्लेख केला पाहिजे. गोदरेज व त्यांचे ब्रॅण्ड्स नेहमीच #आयएफबीएचे मूल्य वाढवतात.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]