इघे अभियंता जानाई श्री पुरस्काराने सन्मानित

0
283

 

पॅशन असेल तरच इंजिनिअरींग क्षेत्रात यश- अभियंता राहुल इघे

राहुल इघे ” अभियंता जानाईश्री ” पुरस्काराने सन्मानित.

लातूर;दि.२७: पॅशन, आवड, जिद्द, आपल्या लोकांसाठी काम करण्याची भावना ही इंजिनिअरींग क्षेत्रात यश मिळवून देते. असे उदगार अभियंता राहुल इघे यांनी अभियंता जानाईश्री पुरस्काराला उत्तर देताना काढले.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पदवीधर आमदार श्रीकांत जोशी,डाॅ.वैशाली टेकाळे,स्मिता इघे,श्रीकांत हिरेमठ, प्रा.दत्तात्रेय मुंढे, सार्थक कुलकर्णी उपस्थित होते.

श्री.जानाई प्रतिष्ठान संस्थेने १५ सप्टे अभियंता दिनी ऑक्सिजन निर्माते अभियंता राहुल इघे यांना अभियंता जानाईश्री पुरस्कार जाहीर केला होता. अभियंता राहुल इघे यांना या पुरस्काराने माजी पदवीधर आमदार अभियंता श्रीकांत जोशी यांच्या  हस्ते जानाई फंक्शन हाॅलमध्ये आयोजीत कार्यक्रमात नुकतेच सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप होते.शाल, हार, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, सर विश्वेश्वरैयांची पगडी व रू१५ हजाराचा धनादेश.

राहुल इघे यांनी ६५ देशात विविध कंपण्याचे आर अॅण्ड डी प्रमुख म्हणून काम केले आहे. कोविडच्या दुस-या लाटेत इघे यांनी हवे पासून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे डीझाईन केले. भारतामध्ये असे २०० ठिकाणी कार्यान्वित केले आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेत श्री जानाई प्रतिष्ठान संस्थेने त्यांची अभियंता जानाईश्री पुरस्कारासाठी निवड केली .

श्रीकांत जोशी यांची खंत

देशहित डोळ्यासमोर ठेवून सर्वोत्तम अभियंते निर्माण होणे ही काळाची गरज आहे , असे प्रतिपादन माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी यावेळी बोलताना केले . ते पुढे म्हणाले की ,जनोपयोगी अभियंते हे असतात. वास्तु उभा करण्यासाठी किंवा मशनरी तयार करण्यासाठी अभियंत्याचे हात जोडलेले असतात . असे कुठलेही अंग नाही की तेथे अभियंते नाहीत.फक्त राजकारणामध्ये अभियंते कमी प्रमाणात दिसून येतात. सोशल इंजिनिअरिंग आपण पाहतो परंतु राजकारणामध्ये देशहित डोळ्यासमोर डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अभियंते कमी प्रमाणात दिसतात.

कार्यक्रमाचे संचलन कृष्णा ठोंबरे व भिकाजी पाटील यांनी केले.प्रास्ताविक डाॅ.वैशाली टेकाळे यांनी केले. संस्था परिचय अतुल ठोंबरे तर सन्मानपत्राचे वाचन गीता ठोंबरे यांनी केले. इघे यांचा परिचय समर्थ कुलकर्णी यानी करून दिला .अध्यक्षीय समारोप पदवीधरांचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी केला. आभार प्रदर्शन समर्थ कुलकर्णी यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी डाॅ विश्वास कुलकर्णी, गुरूनाथ मगे, प्रविण सरदेशमुख, महेंद्र जोशी, सुनिल बोकील, डाॅ.बी .आर .पाटील, शरद कुलकर्णी, संजय अयाचित,सुनिल अयाचित, संपत पाटील,डाॅ.पंकज तेरकर , जेष्ठ पत्रकार गोपाळ कुळकर्णी,  शशिकांत देशमुख, आदींची यावेळी  प्रमुख उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here