इचलकरंजी ; (चिदानंद आलुरे याजकडून )–
दिवंगत माजी खासदार कै. दत्ताजीराव कदम यांच्या पासून ते माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाड यांचेसह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी,पालीकेचे पदाधिकारी, नगरसेवक व सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह इचलकरंजीकरांचे आश्रयस्थान म्हणून ओळखणाऱ्या मुंबईतील गिरगाव कोर्टाजवळ असलेले हॉटेल माधवाश्रम आता नव्याने उभारणी घेणार असून याची जुनी इमारत पाडल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी तेथे जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

इचलकरंजी शहरांतील राजकीय नेते..सामाजिक कार्यकर्ते..व्यापारी असे अनेक लोक कित्येक वर्षे मुंबई येथे खरेदीसाठी..मंत्रालय..हायकोर्ट.. हॉस्पिटल..फिरण्यासाठी..अशा विविध कामांसाठी मुंबई शहरांत जात असतात..मुंबई मध्ये राहण्यासाठी अत्यंत माफक दरामध्ये विचार केला तर गेली ९० वर्षांपासून इचलकरंजी नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकजणांचे आवडते ठिकाण म्हणजे “हॉटेल माधवाश्रम”.. गिरगाव कोर्ट,मुंबई..येथील “हॉटेल माधवाश्रम” म्हणजे मुंबई कामानिमित्त गेलेल्यांच्या काहींना-काहीतरी आठवणी या वास्तुशी जोडल्या गेल्या आहेत..याच हॉटेलमध्ये राहणेसाठी येणारे कित्येकजण मंत्री..आमदार..खासदार..नगराध्यक्ष..उपनगराध्यक्ष..नगरसेवक.. जिल्हा परिषद सदस्य..अशा अनेक राजकीय सोबत नोकरीमध्येही उच्च पदावर गेलेल्यांना “हॉटेल माधवाश्रम”ची आठवण होतेचं..

**गेल्या १०० वर्षांपासून असलेली अनेकांच्या आठवणीमधील “हॉटेल माधवाश्रम”ची वास्तू खूप जुनी झाली होती म्हणून ती जमीनदोस्त करुन नवीन इमारत उभे करण्याचे काम सध्या सुरू आहे..आज दि.०८ जुलै रोजी.इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व रवि रजपुते यांनी “हॉटेल माधवाश्रम” येथे गेल्या ३० वर्षांपासून मुक्कामाचे ठिकाणी भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला… फोट- मुंबई येथील गिरगाव कोर्टाजवळ असणाऱ्या माधवाश्रमची इमारत पाडल्यानंतर या ठिकाणी तानाजी पोवार व रवी रजपुते यांनी भेट दिली