इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील सन्मती सहकारी मल्टिस्टेट बँकेचे चेअरमन तथा माजी नगरसेवक सुनिल सातगोंडा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 27 व 28 ऑक्टोबर रोजी छत्रपती शाहू पुतळा परिसरातील शाळा नं. 21 येथे कोल्हापुर राज्य खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापूर खो-खो असोशिएशनच्या मान्यतेने पुरूष व महिलांचे एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेत खेळलेले 22 खेळाडू वेगवेगळया संघातून खेळणार आहेत. या स्पर्धेमध्ये पुरूष व महिला दोन्ही गटातील प्रथम चार क्रमांकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत.
या स्पर्धेतून उस्मानाबाद येथे होणार्या 55 व्या नॅशनल स्पर्धेसाठी कोल्हापुर राज्य संघ निवडला जाणार आहे. 27 व 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजलेपासून दोन सत्रामध्ये या स्पर्धा संपन्न होतील. स्पर्धेची तयारी पुर्ण झाली असून प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी, फ्लड लाईटसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा सीआरएसएसयु व सुनिल पाटील मित्रमंडळी यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरातील खेळप्रेमी नागरिकंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले.




